सध्या बांगलादेशचा भारत दौरा सुरू आहे. या दौऱ्यावर दोन्ही संघात 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. दरम्यान भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघातील दुसरा टी20 सामना दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने बांगलादेशवर 86 धावांनी शानदार विजय मिळवला.
दुसऱ्या टी20 सामन्यात बांगलादेशने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. प्रत्युत्तरात भारताने मर्यादित 20 षटकात 9 गडी गमावून 221 धावा ठोकल्या. धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 135 धावांवरती गारद झाला. बांगलादेशसाठी महमुदुल्लाहने सर्वाधिक 41 धावांची खेळी खेळली, तर रिशाद होसेनने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
भारतासाठी नितीश रेड्डीने (Nitish Reddy) सर्वाधिक 74 धावांची खेळी खेळली. त्याच्या खेळीत त्याने 7 षटकारांसह 4 चौकार लगावले. त्यानंतर रियान पराग (Riyan Parag) 53, हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) 32 धावांच्या जोरावर भारताने 221 धावांचे लक्ष्य गाठले होते.
भारतासाठी गोलंदाजी करताना नितीश रेड्डी (Nitish Reddy), वरूण चक्रवर्तीने (Varun Chakaravarthy) प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh), फिरकीपटू वाॅशिंग्टन सुंदर, अभिषेक शर्मा (Abhishek Sharma), मयंक यादव (Mayank Yadav), रियान परागने (Riyan Parag) 1-1 विकेट घेतली.
बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात भारताने बांगलादेशचा 7 गडी राखून धुव्वा उडवला होता. आता दुसरा टी20 सामना दिल्लीच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारताने 86 धावांनी शानदार विजय मिळवला. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार 74 धावांची खेळी केलेल्या नितीश रेड्डीला देण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs BAN; बांगलादेशविरूद्ध भारताने रचला इतिहास, षटकारांचा पाडला पाऊस!
IND vs BAN; भारताला मिळाला नवा खतरनाक फलंदाज! ठोकले तुफानी अर्धशतक
IND vs BAN; दुसऱ्या टी20 सामन्यात संजू सॅमसन फ्लाॅप! सोशल मीडियावर चाहत्यांचा हल्लाबोल