---Advertisement---

भारत-बांगलादेश सराव सामन्यादरम्यान संजय मांजरेकरांचा रवींद्र जडेजाला टोला!

RAVINDRA JADEJA
---Advertisement---

आयसीसी टी20 विश्वचषक 2024 रोमांचक सुरु झाला. टी20 विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात धावांचा पाउस पाहायला मिळाला. अमेरिकनं कॅनडाचा 7 विकेट्सनं पराभव करुन घवघवीत यश संपादन केलं. तत्पूर्वी भारतीय संघाचा टी20 विश्वचषकातील पहिला सामना (5 जून) रोजी आयर्लंडविरुद्ध आहे. परंतु भारतीय संघाचा सराव सामना बांगलादेशविरुद्ध नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतानं पाकिस्तानला 60 धावांनी नमवले.

रिषभ पंतनं 32 चेंडूत 53 धावांची धमाकेदार खेळी खेळली. तर हार्दिक पांड्यानं 23 चेंडूत 4 षटकारांच्या मदतीनं 40 धावांची आक्रमक फलंदाजी केली. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा 4 धावांवरती नाबाद तंबूत परतला. सुर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजानं मैदानात आगमनं केलं, परंतु फलंदाजी करत असताना पहिल्याच चेंडूवर बाद होण्यापासून वाचला.

तनवीर इस्लामच्या षटकातील अखेरच्या चेंडूवर जडेजानं स्वीप शाॅट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी राहिला. चेंडू सरळ यष्टीरक्षक लीटन दासच्या हातात गेला. दासनं जडेजाला स्टपिंग करुन अंपायरकडे जोरदार अपील केली. मैदानावरील अंपायरनं थर्ड अंपायरकडे निर्णय पाठविला, परंतु सर्व बाजूनं चेक करुन झाल्यानंतर अंपायरनं जडेजाला नाॅट आउट म्हणून घोषित केलं. परंतु ही सर्व घटना घडल्यानंतर काॅमेंट्री करत असलेल्या संजय मांजरेकर यांनी जडेजावर एक असं वक्तव्य केलं ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

लिटन दासनं जडेजाला स्टपिंग केल्यानंतर संजय मांजरेकर काॅमेंट्री करत असताना म्हणाले, “इथून पाहिल्यानंतर जडेजा बाद झाल्याचं दिसत आहे. परंतु जडेजा अजून फलंदाजी करतोय त्यामुळे मी शांत राहिलं पाहिजे.” मांजरेकरांची ही कमेंट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

2019च्या विश्वचषकापासून रवींद्र जडेजा आणि संजय मांजरेकर यांच्यामद्ये वाद पाहायला मिळत आहेत. तेव्हापासून दोघांनी एकमेकांविरोधात सोशल मीडियावर अनेक वेळा टोलेबाजी केली आहे. 2019च्या विश्वचषकादरम्यानं संजय मांजरेकरांनी जडेजाला एक साधारण खेळाडू म्हटलं होत.

त्यावेळी संजय मांजरेकर म्हणाले, “मी भारतीय संघासाठी थोडं थोडं योगदान देणाऱ्या खेळाडूंचा चाहता नाही. एकदिवसीय सामन्यात जडेजा असंच करतो. कसोटी क्रिकेटमध्ये तो एक गोलंदाज आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये मी त्याला एक फलंदाज किंवा फिरकीपटू घोषित करेन.” यावर जडेजानं उत्तर देत म्हटलं होत की, “तरीही मी तुमच्यापेक्ष्या जास्त सामने खेळलो आहे आणि अजून खेळत आहे. लोकांनी जे काही मिळवलं आहे त्याचा सन्मान करायला शिका.”

महत्त्वाच्या बातम्या-

रोहित शर्मा यशस्वी जयस्वाल नाही तर ‘हे दोन’ खेळाडू करतील विश्वचषकात टीम इंडीयासाठी सलामी!
‘रोहित ब्रिगेड’ला पाकिस्तानच्या ‘या’ 5 खेळाडूंपासून सावध राहावं लागेल, भारताविरुद्ध आहे उत्कृष्ट रेकॉर्ड
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने परिधान केली युगांडा संघाची जर्सी! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---