बांग्लादेशविरुद्धच्या पहिल्या दोन टी20 सामन्यात बेंचवर असलेल्या रवी बिश्नोईला शेवटच्या सामन्यात संधी मिळताच या युवा गोलंदाजाने इतिहास रचला. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या विक्रमी धावसंख्येच्या सामन्यात, बिश्नोईने 4 षटकांच्या मोबदल्यात 30 धावा देऊन सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. या दरम्यान त्याने एक मेडन ओव्हर देखील टाकला. ज्यामध्ये बिश्नोईने नजमुल हुसेन शांतोसह लिटन दास आणि रशीद हुसेन यांची शिकार (विकेट) केली. या तीन विकेट्सच्या जोरावर बिश्नोईने आपल्या टी20 कारकिर्दीत 50 विकेट्सही पूर्ण केल्या.
यासह बिश्नोई आता टी20 मध्ये 50 विकेट घेणारा भारताचा सर्वात तरुण गोलंदाज ठरला आहे. या यादीत त्याने अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहसारख्या गोलंदाजांना मागे टाकले आहे. बिश्नोईने वयाच्या 24 वर्षे 37 दिवसांत ही कामगिरी केली. याआधी हा विक्रम अर्शदीप सिंगच्या नावावर होता ज्याने 24 वर्षे 196 दिवस वयात 50 टी20 विकेट घेतल्या होत्या.
भारतासाठी 50 टी20 विकेट घेणारा सर्वात तरुण खेळाडू
24 वर्षे 37 दिवस – रवी बिश्नोई
24 वर्षे 196 दिवस – अर्शदीप सिंग
25 वर्षे 80 दिवस – जसप्रीत बुमराह
28 वर्षे 237 दिवस – कुलदीप यादव
28 वर्षे 295 दिवस – हार्दिक पांड्या
यासोबतच रवी बिश्नोई सर्वात कमी सामन्यात 50 बळी घेणारा संयुक्तपणे दुसरा भारतीय ठरला आहे. बिश्नोईने 33व्या सामन्यात 50 टी20 विकेट घेत अर्शदीपची बरोबरी केली. या यादीत भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव अव्वल आहे. कुलदीपच्या नावावर 29 सामन्यात 50 टी-20 विकेट घेण्याचा विक्रम आहे.
भारतासाठी सर्वात जलद 50 टी20 विकेट्स (सामन्यांनुसार)
कुलदीप यादव – 29 सामने
रवी बिश्नोई – 33 सामने
अर्शदीप सिंग – 33 सामने
युझवेंद्र चहल – 34 सामने
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, भारताने टाॅस जिंकून पहिल्या डावात खेळताना मर्यादित 20 षटकात 297 धावा केल्या. टी20 क्रिकेटच्या इतिहासातील ही भारताची सर्वात मोठी धावसंख्या आहे. या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना बांग्लादेशचा संघ निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 164 धावाच करू शकला. आशाप्रकारे भारताने हा सामना 133 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला आणि मालिका 3-0 ने जिंकली.
हेही वाचा-
ind vs ban; टीम इंडियाने टी20 मलिका गाजवली; पाकिस्तानचा हा विक्रम मोडीत
टीम इंडियाची हैदराबादमध्ये रेकाॅर्डतोड कामगिरी; बांग्लादेशच्या बत्या गुल..!
IND vs BAN; तिसऱ्या सामन्यात का झाले नाही ‘या’ खेळाडूचे पदार्पण? KKR खूश कारण काय?