टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये शानदार पुनरागमन केले आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात रिषभ पंतने आक्रमक फलंदाजी करत त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 6वे शतक झळकावले आहे. रिषभ पंतने 634 दिवसांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे.
रिषभ पंतने खेळाच्या तिसऱ्या दिवशी 12 धावा करत आपला डाव सुरू ठेवला. रिषभ पंत अर्धशतकापर्यंत अत्यंत सावधपणे फलंदाजी करताना दिसला. मात्र अर्धशतकानंतर त्याने वेग वाढवला व केवळ 125 चेंडूत आपले शतकपूर्ण केले. या शतकानंतर त्याने एमएस धोनीच्या महान विक्रमाला मागे टाकला आहे. रिषभ पंत कसोटीत सर्वाधिक शतके ठोकणारे भारतीय यष्टीरक्षकाच्या यादी अव्वल स्थानी पोहचला आहे. त्याने महेंद्रसिंह धोनीची बरोबरी केली आहे. पण डावाच्याबाबतीत तो धोनीच्या पुढे आहे.
कसोटीत सर्वाधिक शतकं ठोकणारे भारतीय यष्टीरक्षक
रिषभ पंत – 6 (58 डाव)
महेंद्रसिंह धोनी – 6 (144 डाव)
वृद्धिमान साहा – 3 (58 डाव)
भुडी कुंदेरन – 2 (28 डाव)
फारुख इंजिनियर – 2 (87 डाव)
सय्यद किरमानी – 2 (124 डाव)
Just @RishabhPant17 things 🤟🤟
Live – https://t.co/jV4wK7BgV2… #INDvBAN@IDFCFIRSTBank pic.twitter.com/WSYpvqwzr1
— BCCI (@BCCI) September 21, 2024
रिषभ पंतने नोव्हेंबर 2022 मध्ये बांग्लादेशविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती. डिसेंबर 2022 मध्ये तो एका कार अपघाताचा बळी ठरला. तब्बल 21 महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर तो कसोटी संघात परतला आहे आणि पुनरागमनाच्या सामन्यात त्याने खळबळ उडवून दिली आहे. रिषभ पंतने पहिल्या डावात 39 धावांची खेळी केली होती. तर आता दुसऱ्या डावात शतकी खेळीसह 109 धावांवर बाद झाला.
हेही वाचा-
एकदिवसीय सामन्यांमध्ये अफगाणिस्तानसाठी सर्वाधिक शतके
रिषभ पंतनं सेट केली चक्क बांगलादेशची फिल्डिंग! व्हिडिओ पाहून हसू आवरणार नाही
विराट कोहलीचा फॉर्म टीम इंडियाचा चिंतेचा विषय; 2016 नंतर असं पहिल्यांदाच घडलं