टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान इतिहास रचू शकतो. रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम करणार आहे. बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत रोहित शर्मा टीम इंडियाची कमान सांभाळणार आहे.
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. 19 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान दोन्ही देशांदरम्यान कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर दरम्यान चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल. मालिकेतील दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जाईल.
बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान ‘हिटमॅन’चे लक्ष्य मोठ्या विक्रमावर असणार आहे. बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान रोहित शर्मा दोन शतके झळकावण्यात यशस्वी ठरला तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘शतकांचा’ विक्रम करेल. रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 शतके पूर्ण करणार आहे. असे केल्याने ‘हिटमॅन’ भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 शतके झळकावणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरेल.
रोहित शर्मासाठी सप्टेंबर महिना ऐतिहासिक असेल, कारण बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याचे नाव इतिहासाच्या पानात नोंदवले जाईल. भारतासाठी आतापर्यंत फक्त सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 पेक्षा जास्त शतके झळकावली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरच्या नावावर 100 आणि विराट कोहलीच्या नावावर 80 शतके आहेत. रोहित शर्माच्या नावावर सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 48 शतके आहेत. जर रोहित शर्माने बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत आणखी दोन शतके झळकावली तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक पूर्ण करणारा तो जगातील नववा आणि भारताचा केवळ तिसरा फलंदाज ठरेल.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके
1. सचिन तेंडुलकर (भारत) – 100 शतके
2. विराट कोहली (भारत) – 80 शतके
3. रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) – 71 शतके
4. कुमार संगकारा (श्रीलंका) – 63 शतके
5. जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) – 62 शतके
6. हाशिम आमला (दक्षिण आफ्रिका) – 55 शतके
7. महेला जयवर्धने (श्रीलंका) – 54 शतके
8. ब्रायन लारा (वेस्ट इंडिज) – 53 शतके
9. डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) – 49 शतके
10. रोहित शर्मा (भारत) – 48 शतके
हेही वाचा-
देशाचं दुर्दैव! ऑलिम्पिकमधील स्टार खेळाडूचा खेळाला अचानक रामराम, काय आहे कारण?
टी20 विश्वचषकाच्या विजयात या तीन खेळाडूंनी बजावली सर्वात महत्त्वाची भूमिका, रोहित शर्माचा खुलासा
हात-पाय तोडून मग…, कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणावर युझवेंद्र चहलची तिखट प्रतिक्रिया