बांग्लादेशचा संघ पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर जाणार आहे. या कालावधीत दोन्ही देशांदरम्यान कसोटी आणि टी-20 मालिका होणार आहेत. प्रथम कसोटी मालिका खेळवली जाईल. 19 सप्टेंबरपासून दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहेत. मात्र या मालिकेपूर्वीच बांग्लादेश संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा वेगवान गोलंदाज शरीफुल इस्लाम दुखापतीचा बळी ठरला आहे. या कारणामुळे तो पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळत नाहीये. शरीफुल इस्लामला पाठीचा त्रास होता आणि त्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही.
बांग्लादेश संघाचे फिजिओ इस्लाम खान यांच्या म्हणण्यानुसार, शरीफुल इस्लामने पहिल्या कसोटी सामन्यानंतर मांडीच्या भागात वेदना होत असल्याची तक्रार केली होती. यानंतर त्याची चाचणी करण्यात आली, ज्यामध्ये दुखापतीची बाब समोर आली. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शरीफुलने चांगली कामगिरी केली होती. त्याने एकूण 3 बळी घेतले आणि 14 चेंडूत 22 धावांची उपयुक्त खेळीही खेळली. मात्र, दुखापतीमुळे त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडावे लागले. त्याच्या जागी पहिल्या डावात शानदार गोलंदाजी करणाऱ्या तस्किन अहमदचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला. तस्किन अहमदने पाकिस्तानच्या 3 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
बांग्लादेशने पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला असला तरी भारताविरुद्धचा त्यांचा मार्ग सोपा नाही. बांग्लादेशसाठी भारताला भारतात पराभूत करणे खूप कठीण जाईल आणि त्यांना सर्वोत्तम प्रयत्न करावे लागेल. त्यामुळे त्यांनी पूर्ण ताकदीने खेळावे अशी बांग्लादेश संघाची इच्छा आहे. शरीफुल इस्लामची दुखापत पुढे जाऊन गंभीर झाली आणि तो बाहेर पडला, तर बांग्लादेशच्या आशांनाही मोठा धक्का बसू शकतो.
दुसरीकडे टीम इंडियाबद्दल बोलायचे झाले तर 5 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफीमध्ये अनेक खेळाडू खेळताना दिसतील. मात्र, विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह सारखे दिग्गज या स्पर्धेत सहभागी होणार नाहीत.
हेही वाचा-
आश्चर्यकारक! 16 वर्षाच्या संपूर्ण कारकीर्दीत कधीच RUN-OUT झाला नाही ‘हा’ भारतीय
Paris Paralympics 2024: चाैथ्या दिवशी भारताच्या झोळीत येऊ शकतात आणखी 4 पदकं, पाहा वेळापत्रक
दमदार कामगिरीसह रूटच्या निशान्यावर सचिनचा ‘वर्ल्ड रेकाॅर्ड’