भारत आणि बांग्लादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील शेवटचा सामना आज शनिवारी (12 ऑक्टोबर) राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम हैदराबाद खेळवला जाणार आहे. आधीच भारतीय संघाने तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. ग्वाल्हेरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारताने बांग्लादेशचा 6 गडी राखून, तर दुसऱ्या सामन्यात 86 धावांनी पराभव केला. मात्र, तिसऱ्या सामन्यापूर्वी चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आली आहे. पावसामुळे तिसऱ्या सामन्याची मजा खराब होऊ शकते.
सूर्यकुमारच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सलग दुसरी मालिका क्लीन स्वीप करू इच्छितो. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात पावसाची शक्यता आहे. सामन्याच्या दिवशी सकाळी हैदराबादमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुपारी ढगाळ वातावरण राहील. हवामानखात्यानुसार, सामन्यादरम्यान रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तसेच काल शुक्रवारीही पावसामुळे मैदान पूर्णपणे झाकले होते. आजही पावसाची पूर्ण शक्यता आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांना सामना बघायला मिळू शकतो पण मध्येच पाऊस दार ठोठावू शकतो. याआधी बांग्लादेशविरुद्धच्या कानपूर कसोटीदरम्यान पावसामुळे अडीच दिवस खेळ होऊ शकला नव्हता. मात्र अखेरच्या दोन दिवसांत भारताने शानदार कामगिरी करत सामना जिंकला होता.
सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन ड्यूश यांनी सांगितले की, मालिका जिंकल्यामुळे भारतीय संघ सामन्यात नवीन चेहरे आजमावू इच्छितो. म्हणजेच हर्षित राणा आजच्या सामन्यात पदार्पण करण्याची शक्यता आहे.
भारताचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव, नितीश कुमार रेड्डी, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मयंक यादव, हर्षित राणा
हेही वाचा-
कसे असणार भारतीय संघाचे पुढचे ‘मास्टर प्लॅन’? प्रशिक्षकाने स्पष्टच सांगितले
IND vs NZ; कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा…!!!
डीएसपी झालेल्या मोहम्मद सिराजची कुठे होणार पोस्टिंग?