भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने शनिवारी बांग्लादेशविरुद्ध तिसऱ्या टी20 सामन्यात संजू सॅमसनसोबत विक्रमी भागीदारी केली. ज्यामुळे टीम इंडियाने सामन्यात 297 धावांची मोठी धावसंख्या उभारली. ज्यामध्ये सूर्यकुमारने 35 चेंडूत 75 धावांची खेळी करत मोठी कामगिरी केली. आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वात जलद 2500 धावा करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने 71व्या डावात ही कामगिरी केली.
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात सूर्यकुमार यादवने संजू सॅमसनसोबत शतकी भागीदारी केली. दोघांमध्ये 70 चेंडूत 173 धावांची भागीदारी झाली. भारतासाठी सर्वात जलद 2500 धावा पूर्ण करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने 68 डावात हा टप्पा गाठला. पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम हा सर्वात वेगवान 2500 धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 62 डावात ही कामगिरी केली.
आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वात जलद 2500 धावा करणारा खेळाडू
बाबर आझम – 62 डाव
मोहम्मद रिझवान – 65 डाव
विराट कोहली – 68 डाव
सूर्यकुमार यादव – 71 डाव
तर मोहम्मद रिझवानने 65 डावात ही कामगिरी केली होती. रोहित शर्माने 92 व्या डावात 2500 धावांचा टप्पा ओलांडला होता.
सामन्याबद्दल बोलायचे झाल्या भारतीय संघासाठी हा सामना ऐतिहासिक ठरला भारताने या सामन्यात टी20 सर्वोच्च धावसंख्या (297) उभारली. ज्यामध्ये संजूने शतकी , कर्णधार सूर्याने अर्धशतकी त्याचसोबत अन्य फलंदाजांनी देखील आक्रमक खेळी खेळली. 297 धावांचा बलाढ्य धावांचे लक्ष्य पार करण्यासाठी उतरलेला बांग्लादेश संघ केवळ 164 धावापर्यंत पोहचू शकला. तर टीम इंडियाने हा सामना तब्बल 133 धावांनी जिंकला. आणि 3-0 ने खिश्यात घातली.
हेही वाचा-
IND vs BAN T20: कोण ठरला सामनावीर आणि कोणाला मिळाली मालिकावीर ट्रॉफी, जाणून घ्या
ind vs ban; दिवाळीपूर्वी टीम इंडियाची आतषबाजी! ऐतिहासिक विजयासह टी20 मालिका खिश्यात
IND vs BAN; दसऱ्यादिवशीच संजू सॅमसन चमकला, ठोकले झंझावाती शतक!