---Advertisement---

भारत-बांगलादेश टी20 मालिका कोणत्या चॅनलवर लाईव्ह दिसणार? सर्वकाही जाणून घ्या

On: शनिवार, ऑक्टोबर 5, 2024 2:50 PM
---Advertisement---

कसोटी मालिकेनंतर भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना रविवारी (6 ऑक्टोबर) ग्वाल्हेरमध्ये खेळला जाईल.

ग्वाल्हेरला तब्बल 14 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय सामन्याचं यजमानपद मिळालं आहे. याआधी 2010 साली कॅप्टन रूप सिंग स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एकदिवसीय सामना झाला होता. त्या सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं द्विशतक झळकावलं होतं. एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोणत्याही फलंदाजाचं हे पहिलं द्विशतक होतं. मात्र, भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी20 सामना नव्या स्टेडियममध्ये होणार आहे.

भारतीय संघाचं नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे आहे. यापूर्वी भारतानं श्रीलंकेविरुद्ध टी20 मालिका 3-0 अशी जिंकली होती. भारतानं बांगलादेशचा कसोटी मालिकेत सहज पराभ केला, परंतु क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये या संघाला हलक्यात घेणं मोठी चूक ठरू शकते. टीम इंडियाला हे चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळे ही मालिका उत्कंठावर्धक होण्याची पूर्ण शक्यता आहे. ही मालिका कोणत्या चॅनलवर लाईव्ह पाहता येईल, हे आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे सांगतो.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला टी20 सामना रविवार, 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हा सामना ग्वाल्हेरच्या माधव राव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. तुम्ही हा टी20 सामना टीव्हीवर ‘स्पोर्ट्स 18’ चॅनेलवर लाईव्ह पाहू शकता. याशिवाय या सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही ‘जिओ सिनेमा’वर पाहू शकता.

बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ – सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव

हेही वाचा – 

टी20 विश्वचषक भारतीय संघाचे संपूर्ण वेळापत्रक, जाणून घ्या कधी आणि कोणासोबत मुकाबला?
श्रेयस अय्यरच्या कारकिर्दीला ग्रहण, इराणी चषकातही सपशेल फ्लॉप
“धोनी नाही, हा आहे जगातील सर्वोत्तम फिनिशर”, कुमार संगकाराचं मोठं वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---