टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधलं वातावरण किती कूल असतं हे मैदानावरील खेळाडूंची एकमेकांची केमिस्ट्री पाहून समजता येऊ शकते. बांग्लादेशविरुद्धच्या कानपूर कसोटी सामन्यापूर्वी विराट कोहली आणि रवींद्र जडेजा दोघांनी मिळून जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीची नक्कल केली. ते पाहून बुमराहही समोर उभा राहून जोरदार हसत भावाना व्यक्त केल्या.
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे. सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ढगाळ स्थिती पाहून रोहितने हा निर्णय घेतला. या बातमी आखेर बांग्लादेशने तीन विकेट गमावल्या असून संघ 94-3 अश्या स्थितीत आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. ज्यामध्ये विराट कोहली आणि रवींद्र जडेजा दोघेही त्याच्यासमोर बुमराहची नक्कल करत आहेत. बुमराहबद्दल बोलायचे झाले तर लंच ब्रेकपर्यंत त्याने एकूण आठ षटके टाकली ज्यामध्ये 4 मेडनसह त्याने 14 धावा दिल्या. लंच ब्रेकपर्यंत बुमराहचे विकेट खाते रिकामे होते.
Virat Kohli and Jadeja mimics Bumrah’s bowling action infront of him 😭🤣 pic.twitter.com/fRLvNOFAPG
— Vahini🕊️ (@fairytaledustt_) September 27, 2024
विराट कोहली टीममेटची नक्कल करण्यात खूप आग्रेसर असतो. त्याने अनेकदा असे मजेशीर काम केले आहेत. एकदा ईशान किशनने विराट कोहलीची नक्कल केली आणि विराटने पुन्हा त्याची नक्कल केली. कसोटी मालिकेबद्दल बोलायचे झाल्यास भारत आणि बांग्लादेश यांच्यातील मालिकेतील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. ज्यामध्ये भारताने 280 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता रोहितसेनेची नजर दुसरी कसोटी जिंकून बांग्लादेशला क्लीन स्वीप करण्यावर आहे.
हेही वाचा-
अजबच! कानपूरमध्ये चाहत्यांच्या संरक्षणासाठी लंगूरची मदत! काय आहे प्रकरण?
यशस्वी जयस्वालचा खतरनाक झेल, फलंदाज-गोलंदाज कोणाचाच विश्वासच बसेना! VIDEO पाहाच
ind vs ban; पहिल्या सेशननंतर पावसाची एन्ट्री; लंच ब्रेकपर्यंत बांग्लादेश 74-2 स्थितीत