भारत आणि बांग्लादेश यांच्यात उद्या म्हणजेच (27 सप्टेंबरपासून) दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. हा कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. ज्यामध्ये भारतीय संघ हा सामना जिंकून कसोटी मालिकेत बांग्लादेश क्लीन स्वीप करण्याचा प्रयत्न करेल. सामन्यात एकीकडे सर्व चाहत्यांना विराट कोहलीच्या बॅटमधून धावांचा वर्षाव होताना पाहायचा आहे. दुसरीकडे चाहत्यांना रविचंद्रन अश्विनची अष्टपैलू कामगिरी पुन्हा पाहायची आहे.
विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन हे सध्या भारतीय संघाचे दिग्गज खेळाडू आहेत. या दोघांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट विक्रम केले आहेत. पण दोघांच्या पगारात मोठी तफावत आहे. विराट कोहलीचा बीसीसीआयच्या ग्रेड ‘ए’ प्लस श्रेणीत समावेश आहे. तर रविचंद्रन अश्विनला ग्रेड ‘ए’ यादीत ठेवण्यात आले आहे.
विराट कोहली ग्रेड ए प्लस श्रेणीमध्ये आहे. ज्यामध्ये त्याच्याशिवाय इतर तीन खेळाडू आहेत. ग्रेड ए प्लस श्रेणीतील खेळाडूचे वार्षिक वेतन 7 कोटी रुपये आहे. रविचंद्रन अश्विनशिवाय इतर पाच खेळाडू ‘अ’ श्रेणीत आहेत. ए श्रेणीतील खेळाडूचे वार्षिक वेतन 5 कोटी रुपये आहे. अशा परिस्थितीत कोहली आणि अश्विनच्या पगारात 2 कोटींचा फरक आहे.
बीसीसीआयच्या केंद्रीय करारामध्ये विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये असूनही. दोघांनाही कसोटी सामने खेळण्यासाठी समान वेतन मिळते. विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन यांना कसोटी सामना खेळण्यासाठी 15 लाख रुपये मिळतात. अशा परिस्थितीत जेव्हा दोन्ही दिग्गज कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियममध्ये आपला खेळ पूर्ण करतील तेव्हा त्यांच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होतील.
एकदिवसीय सामना खेळण्यासाठी बीसीसीआय विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन यांना समान वेतन देते. दोघांना एकदिवसीय सामना खेळण्यासाठी 6 लाख रुपये मिळतात. आता जरी कोहलीने टी20 मधून निवृत्ती घेतली असली. तरी विराट कोहली जेव्हाही टी20 खेळला तेव्हा त्यामध्ये त्याचा पगार रविचंद्रन अश्विनच्या बरोबरीचा होता. या दोघांना टी-20 सामन्यासाठी 3 लाख रुपये मिळायचे. अश्विनला अजूनही टी-20 सामन्यासाठी तेवढेच मानधन मिळते.
हेही वाचा-
“आता शिकला नाही तर कधी शिकणार…”, पाकिस्तानी दिग्गजाने भारतीय स्टार खेळाडूला सुनावले
MI, RCB पासून CSK पर्यंत…प्रत्येक संघ कोणत्या 5 खेळाडूंना रिटेन करू शकतात; वाचा यादी
कानपूर कसोटीत कोहलीकडून; ‘विराट’ कामगिरी अपेक्षित! या विक्रमांवर असणार डोळा