भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिकेला आजपासून (19 सप्टेंबर) सुरुवात झाली. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नई येथे खेळला जात आहे. बांगलादेशनं टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं.
टॉसच्या वेळी जेव्हा कर्णधार रोहित शर्मानं भारताच्या प्लेइंग 11 ची घोषणा केली, तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. वास्तविक, या कसोटीत टीम इंडिया पाच गोलंदाजांसह उतरली आहे. मात्र गोलंदाजांचं कॉम्बिनेशन तीन फिरकी आणि दोन वेगवान गोलंदाज असं नसून, तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटू असं आहे.
भारताच्या प्लेइंग 11 मध्ये रवींद्र जडेजा आणि आर अश्विन हे दोन फिरकीपटू आहेत. तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि आकाशदीप यांना संधी मिळाली. चाहते मात्र रोहित शर्माच्या या निर्णयानं हैराण आहेत. कारण पाहिलं तर, चेन्नईची खेळपट्टी ही फिरकीपटूंसाठी अनुकूल असते. भारतीय संघात अक्षर पटेल आणि कुलदीप यादवच्या रुपात आणखी 2 फिरकीपटू उपलब्ध आहेत. मात्र मॅनेजमेंटनं दोनच फिरकीपटूंसह खेळण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे.
चेन्नई कसोटी सुरु होण्यापूर्वी बातम्या येत होत्या की, भारत 3 वेगवान गोलंदाजांसह उतरेल. यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे चेन्नईची लाल माती. येथे पहिले तीन दिवस वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. तर शेवटचे दोन दिवस फिरकीपटूंचं वर्चस्व पाहायला मिळेल. यामुळे भारतानं तीन वेगवान गोलंदाजांसह उतरण्याचा निर्णय घेतला.
रोहित शर्मानं टॉसनंतर बोलताना सांगितलं की, “आम्हीही टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीच घेतली असती. ही खेळपट्टी थोडी नरम आहे. येथील परिस्थिती थोडी आव्हानात्मक असू शकते. आम्ही चांगली तयारी केली आहे. आम्ही आमच्या क्षमतेनुसार खेळू.”
हेही वाचा –
ind vs ban; टाॅप ऑर्डर युनीट सपशेल फ्लाॅप; रोहित-विराट सहा, तर गिल शून्यवर बाद
पहिल्या कसोटीत आरसीबीच्या गोलंदाजाला संधी; दुलीप ट्रॉफीत केला होता कहर
‘क्रिकेट हे हिंदू जीवनापेक्षा महत्त्वाचे…’ सोशल मीडियावर बांगलादेश क्रिकेटवर बहिष्कार घालण्याची मागणी