भारतीय क्रिकेट संघ बांग्लादेशविरुद्धची कसोटी मालिका खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. नवीन प्रशिक्षक गौतम गंभीरने आपली रणनीती तयार केली असून खेळाडूंनी सरावा दरम्यान मोठी मेहनत घेतली आहे. गुरुवारपासून (19 सप्टेंबर) सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत खेळल्या गेलेल्या मालिकेतील विजयामुळे अंतिम फेरीतील भारताचा दावा आणखी मजबूत होईल. तत्तपूर्वी या बातमीद्वारे जाणून घेऊयात पहिल्या कसोटी सामन्यासाठी चेन्नई येथील हवामान अंदाज कसा आहे.
अफगाणिस्तानने अलीकडेच भारतात न्यूझीलंड विरुद्ध एकमेव कसोटी सामना आयोजीत केला होता. पण पावसामुळे एकही चेंडू न टाकता हा सामना रद्द करावा लागला. हा सामना ग्रेटर नोएडा येथे होणार होता. भारतीय संघ बांग्लादेश विरुद्ध चेन्नई येथे पहिला कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यावर पावसाचे सावट आहे की नाही, हे जाणून घेणे गरजेचे आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशीचा खेळ पूर्ण होईल की वाहून जाईल? चला तर मग जाणून घेऊयात.
हवामान खात्यानुसार, भारत आणि बांग्लादेश यांच्यातील चेन्नई कसोटी दरम्यान 19 आणि 20 सप्टेंबर रोजी पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसामुळे सामन्यादरम्यान व्यत्यय येऊ शकतो. चांगली गोष्ट म्हणजे यामुळे खेळ जास्त काळ खराब होणार नाही. वेबसाइटनुसार, सामन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे 19 सप्टेंबरला पहिला एक ते दीड तास पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि दुसऱ्या दिवशी 20 सप्टेंबरला तेवढाच पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कसोटी मालिकेसाठी दोन्ही देशांचे संघ-
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाशदीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल
बांगलादेश संघ : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन कुमार दास, मेहिदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, नईम हसन, नाहीद राणा, हसन महमूद, नहीद राणा. तस्किन अहमद, सय्यद खालिद अहमद, जेकर अली
हेही वाचा-
“5-0 ने बॉर्डर-गावस्कर मालिका जिंकू…” ऑस्ट्रेलियन दिग्गजाने टीम इंडियाला डिवचलं
बीसीसीआयचं लक्ष आहे का? टीम इंडियात संधीसाठी धडपडणारा चहल या लीगमध्ये करतोय कहर!
विराट कोहलीच्या शब्दांनी आयुष्य बदलले; युवा गोलंदाजाचे लक्षवेधी वक्तव्य