भारतीय संघ सध्या चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर बांगलादेशविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यात भारताने बांगलादेशला पिछाडीवर सोडले आहे. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रात भारताने डाव घोषित करत बांगलादेशला 515 धावांचे लक्ष्य दिले. तिसऱ्या दिवसाखेर बांगलादेशचा संघ 4 बाद 158 धावा अशा स्थितीत आहे. सामन्यादरम्यान, भारतीय फलंदाज विराट कोहली पंच रिचर्ड कॅटलबरो यांच्यासोबत मस्ती करताना दिसला
भारताने पहिल्या डावात 376 धावा केल्या होत्या. बांगलादेशचा संघ पहिल्या डावात 149 धावांत गडगडला. त्यानंतर भारताने दुसरा डाव 3 विकेट गमावून 287 धावांवर घोषित केला आणि बांगलादेशसमोर मोठे लक्ष्य ठेवले.
विराट आणि पंचांची मस्ती
या लक्ष्याचा बचाव करण्यात भारतीय संघ व्यस्त आहे. दरम्यान, षटकांच्या विश्रांतीदरम्यान विराट कोहली आणि पंच रिचर्ड कॅटलबरो मस्तीच्या मूडमध्ये दिसले. षटक संपल्यानंतर जेव्हा फलंदाज आपली पोजिशन बदलत होते, तेव्हा विराट आणि रिचर्ड यांची भेट झाली आणि पंचांनी विराटला काहीतरी सांगितले. हे ऐकल्यानंतर विराट जोरात हसला आणि पंच त्याच्या खांद्यावर हात ठेवून जोरजोरात हसू लागले. मग दोघेही हसत हसत आपापल्या जागेवर परत गेले.
Virat Kohli having fun with Umpire Richard Kettleborough 😂❤️ pic.twitter.com/EbW5zX78zt
— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) September 21, 2024
दरम्यान विराट जरी मैदानावर मस्ती करताना दिसला असला तरीही फलंदाजीतील त्याची कामगिरी खास राहिली नाही. दुसऱ्या डावात विराट 37 चेंडूत 17 धावा करुन बाद झाला. यादरम्यान त्याने 2 चौकार मारले. तत्पूर्वी पहिल्या डावातही तो सपशेल फ्लॉप ठरला होता. तो 19 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने केवळ 6 धावा करुन बाद झाला होता. आता पुढील सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. भारत आणि बांगलादेश संघातील दुसरा कसोटी सामना कानपूर येथे 27 सप्टेंबरपासून खेळला जाईल. हा सामना 1 ऑक्टोबरला संपेल.
महत्त्वाच्या बातम्या-
VIDEO: “सगळे झोपले आहेत” खेळाडूंवर चिडला भारतीय कर्णधार
‘या’ कारणांमुळे शुबमन गिल होणार भारताचा पुढील कर्णधार?
भारत विजयापासून 6 विकेट दूर, बांगलादेशला चमत्काराची आवश्यकता; तिसऱ्या दिवसाचा हाल जाणून घ्या