भारत आणि बांगलादेश (India And Bangladesh) यांच्यामध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. त्यातील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर रंगला आहे. त्यातील तिसऱ्या दिवशी भारताचा युवा स्टार फलंदाज शुबमन गिलने (Shubman Gill) शानदार शतक झळकावले. दरम्यान त्याने 10 चौकार, 4 षटकार ठोकले. तत्पूर्वी गिल भारतीय संघाचा आगामी कर्णधार होऊ शकतो अशा चर्चा होऊ लागल्या आहेत. या बातमीद्वारे आपण त्यामागील कारण जाणून घेऊया.
सातत्य- शुबमन गिलने (Shubman Gill) कसोटी, एकदिवसीय आणि टी20 फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. दरम्यान त्याचे सातत्य कायम राहिले. विशेषत: गिलने दबावाच्या परिस्थितीतही भारतासाठी चमकदार कामगिरी केली आहे. गिल हा आयपीएलमध्ये गुजरातचा कर्णधार देखील राहिला आहे. त्याच्याकडे कर्णधार होण्यासाठी शानदार कौशल्य आहे. त्यामुळे आगामी कर्णधार म्हणून गिल हा प्रबळ दावेदार असू शकतो.
तिसऱ्या क्रमांकावर सातत्यपूर्ण फलंदाजी- गिलने तिसऱ्या क्रमांकावर सातत्याने फलंदाजी केली आहे. त्याने स्वत:साठी तिसऱ्या क्रमांकाचे स्थान निश्चित केले आहे. असे मानले जाते की नंबर-3 फलंदाजांसाठी चांगले कौशल्य आणि सातत्य खूप महत्त्वाचे आहे. गिल हे दोन्ही करू शकतो. त्यामुळे गिल आगामी कर्णधार होण्याची शक्यता आहे.
कर्णधारपदाचा अनुभव- शुबमन गिलने (Shubman Gill) 2024च्या आयपीएलमध्ये मध्ये गुजरात टायटन्सचे (Gujrat Titans) कर्णधारपद स्वीकारले. त्यामुळे गिलकडे आयपीएलच्या कर्णधारपदाचा अनुभव आहे. या सर्व कारणांमुळे गिल हा भारतीय संघाचा कर्णधार होण्यासाठी प्रबळ दावेदार असल्याचे मानले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत विजयापासून 6 विकेट दूर, बांगलादेशला चमत्काराची आवश्यकता; तिसऱ्या दिवसाचा हाल जाणून घ्या
दिल्ली कॅपिटल्सचं ठरलं! या 5 खेळाडूंना करणार रिटेन; रिषभ पंतबाबत मोठं अपडेट
केएल राहुलचा झंझावाती विक्रम, केवळ खास खेळाडूच करू शकतात अशी कामगिरी