चेन्नईमध्ये पार पडलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या दोन कसोटी सामन्यात दोन्ही संघांना १-१ सामना जिंकण्यात यश आले आहे. त्यानंतर अखेरचे २ कसोटी सामने झाल्यानंतर हे दोन्ही संघ ५ सामन्यांची टी२० आणि ३ सामन्यांची वनडे मालिका खेळतील. यातील वनडे सामन्यांचे आयोजन पुणे शहराच करण्यात आले आहे. परंतु अखेरचा वनडे सामना पुण्यातून दुसऱ्या शहरात हलवण्यात येण्याची शक्यता आहे.
शेवटचा सामन पुणे नव्हे तर मुंबईमध्ये?
भारत आणि इंग्लंड यांच्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार, पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका ही अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये १२, १४, १६, १८ आणि २० मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे. त्यांनतर होणाऱ्या ३ एकदिवसीय मालिकेतील सामने २३, २६ आणि २८ मार्च रोजी पुण्यातील, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार होते. परंतु, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआयमध्ये यासंदर्भात चर्चा सुरू आहे. मालिकेतील शेवटचा एकदिवसीय सामना (२८ मार्च) मुंबईमध्ये खेळवला जाऊ शकतो. याचे कारण असे की, इंग्लंडच्या खेळाडूंना ब्रिटेनला जाण्यासाठी सोईस्कर होऊ शकते. याबाबतीत अजुन अधिकृतपणे निर्णय घेण्यात आला नाही.
कसोटी मालिका बरोबरीवर
पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने आपल्या संघासाठी दुहेरी शतक झळकावत आपल्या संघाला २२७ धावांनी विजय मिळवून दिला होता. त्यांनतर भारतीय संघाने चोख प्रत्युत्तर देत इंग्लंड संघाला ३१७ धावांच्या मोठ्या अंतराने पराभूत केले होते. यात आर अश्विनने अष्टपैलू कामगिरी करत शतक झळकावले होते आणि ८ गडी बाद करण्यात त्याला यश आले होते.
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी दोन्हीही संघ अहमदाबादमध्ये दाखल
अहमदाबादमध्ये बनवण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठे स्टेडियम म्हणजेच मोटेरा स्टेडियममध्ये मालिकेतील ३ रा आणि ४ था कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. या स्टेडियममध्ये १ लाखांपेक्षा अधिक प्रेक्षक एकाच वेळी सामना पाहण्याचा आनंद घेऊ शकतात. दोन्हीही संघ अहमदाबादमध्ये दाखल झाले आहेत. ही मालिका संपल्यानंतर दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. हे पाचही सामने अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियममध्येच खेळवण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टेम्पो चालकाचा मुलगा ते नेट बॉलर अन् आता आयपीएल गाजवण्यास सज्ज, पाहा कोण आहे तो?
बॉलिवूडचा ‘किंग खान’च्या नावावर आपले नाव ठेवणारा शाहरुख बनला कोट्याधीश, वाचा त्याची रोमांचक कहाणी
आधीच पराभव वरुन मोठा धक्का! इंग्लंडचा ‘हा’ अष्टपैलू चौथ्या कसोटीतून बाहेर