भारत आणि इंग्लंडयांच्यामध्ये मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये सुरु आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 5 गडी 326 धावा केल्या. पहिला दिवस कर्णधार रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि सरफराज खान यांनी गाजवला होता. तसेच पहिल्या सत्रात टीम इंडियाची 3 बाद 33 धावा अशी नाजूक स्थिती झाली होती.
याबरोबरच, पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रवींद्र जडेजा नाबाद 110 धावा आणि कुलदीप यादव 1 धावसंख्येवर खेळत होता. तर दुसऱ्या दिवशी पहिल्या अर्ध्या तासात भारताला दोन मोठे बसले. अँडरसनने कुलदीप यादवला आणि जो रूटने रवींद्र जडेजाचा आऊट केले. जडेजाने 225 चेंडूत 112 धावांची खेळी खेळली आहे. तर त्याच्या या खेळीत त्याने नऊ चौकार आणि दोन षटकार मारले आहेत.
तसेच दुसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत भारताने पहिल्या डावात सात गडी गमावून 388 धावा केल्या होत्या. तर उपाहारानंतर वेगाने खेळण्यास सुरवात केली होती. त्यामुळे रविचंद्रन अश्विन मोठा फटका खेळण्याच्या नादात 37 धावांवर बाद झाला होता. यानंतर भारताला 415 धावांवर नववा धक्का बसला होता. त्याला रेहान अहमदने ध्रुव जुरेलला 46 धावांवर झेलबाद केले आहे. यानंतर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने काही वेळ मोठे फटके मारत भारतीय संघ 445 धावांवर सर्वबाद झाला आहे.
दरम्यान, आज दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर भारताला दोन धक्के बसले होते. कुलदीप यादव चार धावा करून जेम्स अँडरसनचा बळी ठरला. त्याचवेळी रवींद्र जडेजाने जो रूटला त्याच्याच चेंडूवर झेलबाद केले. 225 चेंडूत 112 धावा करून तो बाद झाला होता. तसेच हे दोन्ही धक्के आजच्या पहिल्या अर्ध्या तासात भारताला बसले होते.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड, जेम्स अँडरसन.
महत्वाच्या बातम्या –
- NZ vs SA : दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट्सने केला पराभव, संपला 92 वर्षांचा दुष्काळ
- IND Vs ENG : रवींद्र जडेजाची कामगिरी पाहून रवी शास्त्री यांना झाली डॉन ब्रॅडमनची आठवण, म्हणाले…