भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी भारताने 3 बाद 33 धावांवरून दिवसअखेर 5 बाद 326 धावा केल्या. रोहित शर्माने 131 धावांची शतकी खेळी केली. तर रविंद्र जडेजाने नाबाद 110 धावा केल्या आहेत. रोहित आणि जडेजाने चौथ्या विकेटसाठी 204 धावांची भागीदारी रचली. तसेच सर्फराज खानने 66 चेंडूत 62 धावा ठोकत भारताला पहिल्या दिवशीच 300 पार पोहचवले होते. तसेच रविंद्र जडेजाने झुंजार शतक ठोकत भारताला पहिल्या डावात सावरण्याचं काम केलं आहे.
याबरोबरच, राजकोट कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर रवींद्र जडेजाने 110 धावा केल्या होत्या. तर या शतकी खेळीत त्याच्या बॅटमधून 9 चौकार आणि 2 षटकारही निघाले होते. विशेष म्हणजे या शानदार खेळीसह जडेजाने आपल्या कारकिर्दीत 3000 कसोटी धावाही पूर्ण केल्या आहेत. तसेच जडेजाची ही खेळी पाहून भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांना ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमनची आठवण झाली आहे.
3000 Test runs and counting for @imjadeja 🙌🙌#TeamIndia #INDvENG pic.twitter.com/jX3EIOlWtb
— BCCI (@BCCI) February 15, 2024
भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रवींद्र जडेजाच्या खेळीचे भरभरून कौतुक केले आहे. तसेच रवी शास्त्री म्हणाले आहेत की, माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डॉन ब्रॅडमन हे देखील जडेजाच्या खेळीवर वरून लक्ष ठेवून असतील. याबरोबरच रवींद्र जडेजा केवळ बॅटनेच नाही तर गोलंदाजीतही चमत्कार करत आहे. त्यामुळे रवी शास्त्रींना जडेजाचे कौतुक करणे थांबवता आले नाही आणि ब्रॅडमनची आठवण झाली आहे.
दरम्यान, भारत आणि इंग्लंड मालिकेत भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाची कामगिरी चांगली झाली आहे. तसेच जडेजाने पहिल्या कसोटी सामन्यातही अर्धशतक झळकावले होते. याशिवाय या खेळाडूने गोलंदाजीतही आपले कौशल्य दाखवले. मात्र, पहिल्या कसोटी सामन्यात सिंगल घेताना खेळाडूला दुखापत झाली होती.
Test Hundred on his home ground!
A hard fought 4th Test ton and second in Rajkot from @imjadeja 👏 👏#INDvENG @IDFCFIRSTBank pic.twitter.com/osxLb6gitm
— BCCI (@BCCI) February 15, 2024
भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. तर ही मालिका अजूनही बरोबरीत सुरू आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून इंग्लंडने भारतीय संघाला तणावात टाकले होते. यानंतर भारतानेही शानदार पुनरागमन करत दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पराभव केला. अशा परिस्थितीत करोडो चाहत्यांचे लक्ष आता तिसऱ्या कसोटी सामन्याकडे लागले आहे.
महत्वाच्या बातम्या –