इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतील पहिला दिवस टीम इंडियाच्या नावावर राहिला. टीम इंडियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 5 विकेट्स गमावून 86 ओव्हरमध्ये 326 धावा केल्या होत्या. प्टन रोहित शर्मा, जडेजा आणि डेब्यूटंट सरफराज खान या तिघांनी पहिला दिवस गाजवला. टीम इंडियाकडून रोहित शर्मा याने सर्वाधिक 131 धावांची खेळी केली आहे.
याबरोबरच, रफराज दुर्देवी ठरला. सरफराज रवींद्र जडेजाच्या चुकीच्या कॉलमुळे 62 धावांवर रन आऊट झाला. धमाकेदार खेळी करत असलेला सरफराज रन आऊट झाल्याने नेटकऱ्यांनी जडेजावर सोशल मीडियावरुन टीका केली आहे. तसेच तिसऱ्या कसोटीतीत पदार्पण करणाऱ्या सरफराज खानने दमदार फलंदाजी करताना अर्धशतक केले. तर या सामन्यात आणखी एक फलंदाज ध्रुव जुरेलनेही पदार्पण केले, पण प्रशिक्षक राहुल द्रविडने या दोन पदार्पण करणाऱ्या खेळाडूंपूर्वी दुसऱ्या कोणाला तरी फलंदाजीसाठी पाठवले होते.
याआधी भारताने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधत तिसऱ्या कसोटी सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये 4 बदल केले होत. तर दोन खेळाडूंना पुनरागमनाची संधी देण्यात आली तर दोन खेळाडूंनी कसोटी पदार्पण केले. पहिला सामना खेळताना सरफराज खानने 62 धावांची शानदार खेळी खेळली. पण रवींद्र जडेजाच्या चुकीच्या निर्णयामुळे तो धावबाद झाला आहे. पहिल्या दिवशी भारताने लवकर विकेट गमावल्या पण प्रशिक्षक राहुल द्रविडने पदार्पण करणाऱ्या फलंदाजांना प्रथम मैदानात पाठवले नाही.
प्रशिक्षक राहुल द्रविडने म्हंटले आहे की, पदार्पणाच्या सामन्यात या फलंदाजाला फलंदाजीसाठी खाली पाठवले आणि यामागचे कारण विकेट लवकर पडणे हे होते. 33 धावांवर 3 विकेट पडल्या नसत्या आणि 133 धावांवर परिस्थिती तशीच राहिली असती तर नक्कीच सर्फराज खानला रवींद्र जडेजापुढे पाठवले असते. सरफराजने पदार्पणातच खेळ दाखवला असता, त्याला जडेजाआधी पाठवले असते तर त्याला शतकही करता आले असते.
दरम्यान, ध्रुव जुरेलच्या आधी कुलदीप यादवला फलंदाजीसाठी पाठवण्यात आले. यामागचे कारण सर्वांना माहीत आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपायला फारच कमी वेळ शिल्लक होता, त्यामुळे प्रशिक्षकाने कुलदीपला नाईट वॉचमन म्हणून मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला होता.
महत्वाच्या बातम्या –
- IND vs ENG । सरफराजच्या वडिलांकडून रोहितचा सर म्हणून उल्लेख, कर्णधाराचे मन जिंकणारे उत्तर
- प्रथम श्रेणी कबड्डी स्पर्धेत अमर क्रीडा, शिवनेरी सेवा, अंकुर स्पोर्टस्, लायन्स स्पोर्टस् उपांत्यपूर्व फेरी दाखल.