---Advertisement---

लिलावात अनसोल्ड राहिल्याचा बदला! अवघ्या 28 चेंडूत ठोकलं शतक, रिषभ पंतचा मोठा विक्रम उद्ध्वस्त

On: बुधवार, नोव्हेंबर 27, 2024 12:58 PM
---Advertisement---

अलीकडेच सौदी अरेबियातील जेद्दाह येथे आयपीएल 2025 चा मेगा लिलाव संपन्न झाला. दोन दिवस चाललेल्या या इव्हेंटमध्ये भारताच्या अनेक अनकॅप्ड खेळाडूंनी भाग घेतला होता, परंतु बहुतेकांच्या हाती निराशाचा आली. गुजरातचा यष्टीरक्षक फलंदाज उर्विल पटेलसोबतही असंच काहीसं घडलं.

उर्विलला लिलावात कोणीही विकत घेतलं नाही. मात्र आता त्यानं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अवघ्या 28 चेंडूत शतक झळकावून इतिहास रचला आहे. आपल्या झंझावाती खेळीनं उर्विलनं टी20 क्रिकेटमध्ये कोणत्याही भारतीय फलंदाजाचा सर्वात वेगवान शतकाचा विक्रम मोडला. हा विक्रम आतापर्यंत रिषभ पंतच्या नावावर होता.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा सामना आज (27 नोव्हेंबर) गुजरात आणि त्रिपुरा यांच्यात खेळला गेला. या सामन्यात गुजरातला 156 धावांचं लक्ष्य मिळालं होतं. त्याचा पाठलाग करताना उर्विल पटेलनं ही ऐतिहासिक खेळी खेळली. त्यानं अवघ्या 28 चेंडूत शतक पूर्ण केलं. हा भारतासाठी टी20 क्रिकेटमध्ये कोणत्याही फलंदाजाचा सर्वात जलद शतकाचा विक्रम आहे. यापूर्वी हा विक्रम रिषभ पंतच्या नावावर होता, ज्यानं 2018 मध्ये हिमाचल प्रदेश विरुद्ध दिल्लीकडून खेळताना केवळ 32 चेंडूत शतक ठोकलं होतं. रिषभचा हा रेकॉर्ड आता उर्विलच्या नावे झाला आहे.

उर्विलनं या सामन्यात 35 चेंडूत 7 चौकार आणि 12 षटकारांसह नाबाद 113 धावांची खेळी खेळली. त्याच्या खेळीमुळे गुजरातनं अवघ्या 10.2 षटकांत 156 धावांचं लक्ष्य गाठलं आणि एकतर्फी विजयाची नोंद केली.

उर्विल गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही प्रकाशझोतात आला होता. तेव्हा त्यानं लिस्ट ए क्रिकेटमध्ये कोणत्याही भारतीयाद्वारे दुसरं सर्वात जलद शतक झळकावलं होतं. उर्विलनं 41 चेंडूत ही खेळी खेळली होती. मात्र तो युसूफ पठाणचा मोडू शकला नाही. युसूफनं महाराष्ट्राविरुद्ध 40 चेंडूत 100 धावांची विक्रमी खेळी खेळली आहे. उर्वीलनं अरुणाचल प्रदेशविरुद्ध ही कामगिरी केली होती.

हेही वाचा – 

एका बाउन्सरने घेतला जीव, आजच्याच दिवशी घडली होती क्रिकेट इतिहासातील सर्वात दु:खद घटना!
मेगा लिलावात भारतानंतर कोणत्या देशाच्या खेळाडूंवर लागली सर्वाधिक बोली? या देशाचे खेळाडू रिकाम्या हातानं परतले
सचिन-सेहवागशी तुलना झालेला पृथ्वी शॉ लिलावात अनसोल्ड का राहिला? कारण जाणून घ्या

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---