---Advertisement---

जसप्रीत बुमराहला तोड नाही! आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल स्थानी झेप; टॉप 10 मध्ये आणखी दोन भारतीय

On: बुधवार, नोव्हेंबर 27, 2024 3:03 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात धुमाकूळ घालणारा भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह कसोटीमध्ये जगातील नंबर 1 गोलंदाज बनला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थ येथे खेळल्या गेलेल्या कसोटीनंतर आयसीसीनं गोलंदाजांची क्रमवारी जाहीर केली. यामध्ये बुमराहनं दोन दिग्गजांना मागे टाकत पहिलं स्थान मिळवलं.

जसप्रीत बुमराहनं पर्थ कसोटीत आठ विकेट घेतल्या होत्या. त्यानं पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 3 विकेट्स घेतल्या. या कामगिरीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. यानंतर आता तो कसोटीतील नंबर 1 गोलंदाज बनला आहे. त्याच्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा घातक वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर होता. तर ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड दुसऱ्या स्थानावर होता. बुमराहचा क्रमांक तिसरा होता. आता त्यानं या दोघांना मागे टाकत पहिलं स्थान मिळवलं आहे.

ताज्या आयसीसी क्रमवारीत जसप्रीत बुमराहचे 883 रेटिंग गुण आहेत. तर कागिसो रबाडाचे 872 रेटिंग गुण आहेत. रबाडाची आता दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली असून हेझलवूड 860 रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

जसप्रीत बुमराह याआधीही आयसीसी कसोटी क्रमवारीत नंबर 1 गोलंदाज होता. 30 ऑक्टोबर रोजी रबाडानं बुमराहकडून नंबर वनचा खिताब हिसकावला होता. आता 27 दिवसांनंतर बुमराहनं पुन्हा पहिलं स्थान मिळवलं आहे. ताज्या आयसीसी क्रमवारीत, दोन अन्य भारतीय गोलंदाजांचाही टॉप-10 मध्ये समावेश आहे. ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन चौथ्या क्रमांकावर असून त्याच्यासह फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा सातव्या स्थानावर आहे. हे दोघेही ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ कसोटीत खेळले नव्हते. मात्र याचा त्यांच्या रँकिंगवर कुठलाही परिणाम झाला नाही.

हेही वाचा – 

पाकिस्तानात राजकीय गोंधळ, चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद गमावण्याचा धोका; आयसीसीनं बोलावली महत्त्वाची बैठक
लिलावात अनसोल्ड राहिल्याचा बदला! अवघ्या 28 चेंडूत ठोकलं शतक, रिषभ पंतचा मोठा विक्रम उद्ध्वस्त
एका बाउन्सरने घेतला जीव, आजच्याच दिवशी घडली होती क्रिकेट इतिहासातील सर्वात दु:खद घटना!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---