---Advertisement---

चांगल्या कामगिरीचं बक्षीस मिळालं! आयसीसी रँकिंगमध्ये कोहली-जयस्वालची मोठी झेप

On: बुधवार, नोव्हेंबर 27, 2024 3:36 PM
---Advertisement---

नुकत्याच जारी आयसीसी कसोटी क्रमवारीत भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालला मोठा फायदा झाला आहे. त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ कसोटीत शानदार शतक झळकावलं होतं. या कामगिरीनंतर तो आता फलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. इंग्लंडचा दिग्गज जो रुट अजूनही पहिल्या स्थानावर काबिज आहे.

पर्थ कसोटीच्या पहिल्या डावात यशस्वी जयस्वाल फारशी कमाल दाखवू शकला नव्हता. मात्र दुसऱ्या डावात त्यानं 161 धावा ठोकल्या. अशाप्रकारे त्यानं ऑस्ट्रेलियातील आपल्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावलं. या कामगिरीचा त्याला आयसीसी क्रमवारीत फायदा झाला आहे.

यशस्वी जयस्वालसह ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडला क्रमवारीत फायदा झाला. तो तीन स्थानांची झेप घेऊन 10व्या स्थानावर आला आहे. हेड पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. भारताचा रिषभ पंत सहाव्या स्थानावर कायम आहे. मात्र ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथची दोन स्थानांची घसरण होऊन तो सातव्या स्थानावर पोहचला. तर उस्मान ख्वाजा चार स्थानांनी घसरून 12व्या स्थानावर आला आहे. हे दोघे पहिल्या कसोटीत सपशेल अपयशी ठरले होते.

पर्थमध्ये आपलं 30 वं कसोटी शतक झळकावणाऱ्या विराट कोहलीला नऊ स्थानांचा मोठा फायदा झाला. तो आता 13व्या स्थानावर पोहोचला आहे. याशिवाय केएल राहुलनं तब्बल 13 स्थानांची झेप घेत 49वं स्थान पटकावलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण करणारा नितीश कुमार रेड्डी 74व्या स्थानावर पोहोचला आहे. वेस्ट इंडिजचा ॲलेक अथनाजे 18 स्थानांनी पुढे सरकून 62 व्या, जस्टिन ग्रीव्हज 43 स्थानांनी पुढे सरकून 81 व्या आणि मायकेल लुईस 25 स्थानांची झेप घेऊन 86 व्या स्थानावर आला आहे. बांगलादेशच्या झाकीर अलीनं 24 स्थानांची झेप घेत करत 84वं स्थान मिळवलं.

हेही वाचा – 

जसप्रीत बुमराहला तोड नाही! आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल स्थानी झेप; टॉप 10 मध्ये आणखी दोन भारतीय
पाकिस्तानात राजकीय गोंधळ, चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद गमावण्याचा धोका; आयसीसीनं बोलावली महत्त्वाची बैठक
लिलावात अनसोल्ड राहिल्याचा बदला! अवघ्या 28 चेंडूत ठोकलं शतक, रिषभ पंतचा मोठा विक्रम उद्ध्वस्त

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---