NZ vs SA : स्टार फलंदाज केन विलियम्सन याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत आणखी एक शतक झळकावले आहे. तर दोन सामन्यांच्या मालिकेतील हे त्याचे तिसरे शतक ठरले आणि त्याचे हे कसोटीतील ३२वे शतक ठरले आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या कसोटी मालिकेत ३ किंवा त्यापेक्षा अधिक शतक झळकावणारा तो पहिला खेळाडू बनला आहे. याबरोबरच न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटीतही दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला आहे.
न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये 1932 साली पहिली कसोटी मालिका खेळली गेली होती. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली. तेव्हापासून, 92 वर्षांत, न्यूझीलंडने 18 कसोटी मालिकांपैकी एकही गमावलेली नाही. या कालावधीत चार कसोटी मालिका अनिर्णित राहिल्या आणि दक्षिण आफ्रिकेने 14 मालिका जिंकल्या. आता पहिल्यांदाच न्यूझीलंड संघाने विजय मिळवला आहे.
याबरोबरच, न्यूझीलंडच्या या ऐतिहासिक विजयात केन विल्यमसन आणि गोलंदाजीत विल्यम ओरूर्कने सर्वाधिक योगदान दिले आहे. तसेच केन विल्यमसनने या दोन कसोटी सामन्यांच्या 4 डावात 403 धावा केल्या, तर ओ’रुर्कने केवळ एका सामन्यात 9 विकेट घेत प्रोटीज फलंदाजीचे कंबरडे मोडून काडले आहे. तसेच मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत ओ’रुर्कने ही दमदार कामगिरी केली. या कामगिरीमुळे त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा पुरस्कारही देण्यात आला आहे.
तसेच दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावातील 242 धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव 211 धावांवर आटोपला होता. तसेच आफ्रिकेचा पदार्पणवीर गोलंदाज डेन पिएड्तने पाच विकेट्स घेतल्या. पण, त्याच्या मेहनतीवर फलंदाजांनी पाणी फिरवले. आफ्रिकेला दुसऱ्या डावात 235 धावा करता आल्या. डेव्हिड वेडिंगहॅमने 110 धावांची महत्त्वाची खेळी केली होती.
त्यानंतर किगन पीटरसन ( 43) व कर्णधार नील ब्रँड (34) हे सर्वाधिक धावा करणारे फलंदाज ठरले. तसेच 267 धावांचा पाठलाग करताना टॉम लॅथम ( 30) व डेवॉन कॉनवे ( 17) हे स्वस्तात माघारी परतले. पण, केन मैदानावर उभा राहिला आणि त्याने शतक झळकावत विल यंगच्या साथीने संघाला विजय मिळवून दिला आहे.
महत्वाच्या बातम्या –
- IND vs ENG : सरफराज खानने पदार्पणातच अनिल कुंबळेच्या विक्रमाची केली बरोबरी, रेकॉर्ड जाणून व्हाल थक्क
- पदार्पणातच सर्फराज खान आणि नंतर ध्रुव जुरेल, राहुल द्रविडने त्यांना फलंदाजी करण्यापासुन का रोखले, घ्या जाणून