---Advertisement---

उडता बेन! स्टोक्सचा एकहाती झेल पाहून व्हाल चकित, व्हिडिओ होतोय व्हायरल

On: गुरूवार, मार्च 18, 2021 10:55 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंडच्या संघातील पाच टी२० सामन्यांच्या मालिकेतील चौथा टी२० सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. सूर्यकुमार यादवचे अर्धशतक आणि श्रेयस अय्यरच्या आक्रमक खेळीमुळे भारताला २० षटकात ८ बाद १८५ धावा करता आल्या. भारताच्या डावादरम्यान इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सने एक अप्रतिम झेल घेत वाहवा मिळवली.

स्टोक्सचा शानदार झेल
भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात मिळाली नाही. रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली अपयशी ठरले. मात्र, आपला दुसरा सामना खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवने तुफानी अर्धशतक झळकावले. श्रेयस अय्यरने उपयुक्त आक्रमक खेळी केली.
भारतीय डावादरम्यान श्रेयस अय्यर व हार्दिक पंड्या यांच्यादरम्यान सहाव्या गड्यासाठी चांगली भागीदारी होत होती.

मात्र, भारतीय डावाच्या एकोणिसाव्या षटकात पंड्याने मारलेला फटका मिड ऑफला उभ्या असलेल्या बेन स्टोक्सने हवेमध्ये सूर मारत एका हातात झेलला. त्याच्या या अप्रतिम झेलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

https://twitter.com/gatsbyweed/status/1372584463973019648

इंग्लंडचे प्रत्युत्तर
भारतीय संघाने दिलेल्या १८६ धावांच्या आव्हानाचा इंग्लंड संघ नेटाने पाठलाग करत आहे. मागील सामन्यात नायक ठरलेला जोस बटलर ९ तर, डेव्हिड मलान १४ धावा काढून बाद झाला. सलामीवीर जेसन रॉयने सलग तिसऱ्या सामन्यात ४० पेक्षा अधिक धावांची खेळी केली. मात्र, तो हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर बाद झाला. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा, इंग्लंडने १४ षटकात ११८ धावा काढल्या होत्या. बेन स्टोक्स २८ तर, जॉनी बेअरस्टो २५ धावांवर नाबाद होते.

महत्त्वाच्या बातम्या –

Video: स्काय इज द लिमीट! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत सूर्यकुमारचे धमाकेदार आगमन

Video: आऊट की नॉटआऊट? सुर्यकुमार, सुंदरची विकेट ठरली वादग्रस्त, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

भारतात रोहितच ‘सिक्सर किंग’! पहिल्या चेंडू षटकार मारत ‘हा’ विक्रम करणारा ठरला पहिलाच भारतीय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---