---Advertisement---

रिषभ पंतने शतक करताच द्रविडचा दिसला कधीच न पाहिलेला अवतार, Video व्हायरल

On: शनिवार, जुलै 2, 2022 11:51 AM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND), एजबस्टन क्रिकेट ग्राउंड, बर्मिंघम येथे पाचवा कसोटी सामना सुरू आहे. यामध्ये पहिल्या दिवसाचा खेळ संपला असता भारताने ७ विकेट्स गमावत ३३८ धावा केल्या आहेत. यामध्ये यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याने उल्लेखनीय खेळी करत सर्वांची मने जिंकली आहेत. त्यातच प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी त्याच्या शतकाचा असा काही जल्लोष केला की सगळे आश्चर्यचकित झाले आहेत.

या सामन्यात भारत पहिल्या डावात ५ बाद ९८ धावा अशा स्थितीत असताना पंतने खेळपट्टीवर येत चौफेर फलंदाजी केली आहे. त्याने ८९ चेंडूत शतक पूर्ण केले. तेव्हा पवेलियनमध्ये बसलेल्या भारतीय चमूने टाळ्या वाजवत आणि ओरडत या शतकाचा आनंद साजरा केला आहे. त्यामध्ये द्रविड यांनी व्यक्त केलेला आनंद सर्वापेक्षा वेगळा दिसत होता. नेहमी शांत असणारे द्रविड यांनी यावेळी उभे राहून दोन्ही हात उंचावत जल्लोष केला आहे.

एक खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून द्रविडच्या या दोन भुमिकेमध्ये फार मोठा बदल दिसला आहे. खेळाडू होते तेव्हा ते शांत दिसत होते, तर प्रशिक्षक झाल्यापासून ते नेहमी संघाच्या आनंदात सहभागी दिसले आहेत. यावेळीही त्यांनी विराट कोहली (Virat Kohli), मयंक अग्रवाल, मोहम्मद सिराज आदी खेळाडूंसोबत पंतच्या शतकाचा आनंद साजरा केला आहे.

या सामन्यामध्ये बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गोलंदाजांनी भारताच्या प्रमुख फलंदाजांना लवकर बाद केले आहे. मॅथ्यू पॉट्स आणि जेम्स स्मिथ या जोडीने अप्रतिम गोलंदाजी करत भारताचे सलामीवीर आणि मधल्या फळीतील फलंदाजांना लवकर तंबूत पाठवले आहेत. नंतर मात्र पंत-रवींद्र जडेजा जोडीने तुफानी फलंदाजी करत संघाचा धावफलक हलता ठेवला आहे. पंत २० चौकार आणि ४ षटकाराच्या साहाय्याने १४६ धावा करत बाद झाला तर जडेजा ८३ धावा करत खेळपट्टीवर आहे.

पंतने ३१ कसोटी सामने खेळताना ५ शतके झळकावली आहेत. त्याचे हे इंग्लंड विरुद्धचे तिसरे शतक ठरले आहे. त्याचबरोबर आशिया खंडाबाहेर हे त्याचे चौथे कसोटी शतक आहे.

पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत भारत २-१ असा पुढे असून भारतीय संघ हा शेवटचा सामना जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. भारताला मालिका जिंकण्यासाठी हा सामना जिंकावा किंवा अनिर्णीत ठेवावा लागेल. यजमान संघाला मालिका बरोबरीत आणण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक आहे. यामुळे दोन्ही संघ हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करणार आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

वनडे आणि टी२० मालिकेचा इंग्लंडचा संघ जाहीर; बटलरकडे नेतृत्त्वपद, तर ‘हा’ घातक फिरकीपटू बाहेर

ENGvsIND: पंत-जडेजा जोडीची कमाल सचिन-अझरूद्दीनच्या ‘त्या’ २५वर्षे जुन्या विक्रमाशी केली बरोबरी

दिनेश कार्तिकच्या नेतृत्त्वाखाली भारताचा सोपा विजय, डर्बीशायरला ७ विकेट्सने केले पराभूत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---