रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघ सध्या मायदेशात इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. पाच सामन्यांची कसोटी मालिका शेवटच्या टप्प्यात आली आहे. गुरुवारी (7 मार्च) धरमशाला स्टेडियमवर उभय संघातील पाचवा आणि शेवटचा सामना सुरू होईल. या सामन्यासाठी धरमशाला स्टेडियमवर रोहित आगमन ज्या पद्धतीने झाले, त्याची सध्या चर्चा होत आहे.
रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वात भारताने इंग्लंडविरुद्धचा शेवटचा कसोटी सामना खेळण्याआधीच मालिका नावावर केली आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला. पण त्यानंतर मागच्या सलग तीन कसोटी सामन्यात इंग्लंडला भारताकडून पराभव मिळाला. भारतीय संघ सध्या 3-1 अशा विजयी आघाडीवर आहे. मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना जिंकून मालिकेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा असेल.
गुरुवारी धरमशालेत सुरू होण्याऱ्या कसोटी सामन्यासाठी रोहित शर्मा मंगळवारी (5 मार्च) याठिकाणी पोहोचला. नेहमी संघाच्या बसमध्ये येणारा रोहित यावेळी मात्र बसमध्ये आला नाही. यावेळी कर्णधाराची एन्ट्री अगदी रुबाबात आणि दिमाखात झाली. भारतीय कर्णधाराला धरमशालेत सोडवण्यासाठी कुठली बस किंवा कार आली नव्हती. तर तो थेट व्हायवेट हेलिकॉप्टर घेऊन याठिकाणी आला होता. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Rohit Sharma has reached Dharamshala in a private helicopter. pic.twitter.com/YYp3WxtDqV
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 5, 2024
दरम्यान, उभय संघांतील या शेवटच्या कसोटी सामन्यात रोहित काही खास विक्रम देखील नावावर करू शकतो. अवघा एक षटकार मारला, तर रोहित जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 50 षटकार पूर्ण करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू बनू शकतो. त्याने आतापर्यंत 31 डब्ल्यूटीसी सामन्यांमध्ये 49 षटकार मारले आहेत. याआधी इंग्लंडच्या बेन स्टोक्स यानेही डब्ल्यूटीसमध्ये 50 षटकारांचा टप्पा पूर्ण केला होता. अशी कामगिरी करणार स्टोक्स सध्या एकमेब क्रिकेटपटू आहे. (Rohit Sharma has reached Dharamshala in a private helicopter)
महत्वाच्या बातम्या –
कर्णधाराकडून कोचकडे दुर्लक्ष, वाचा रणजी ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात तामिळणाडूच्या पराभवाचे खरे कारण
एलिस पेरीचा काच फोट षटकार! टाटा कारचे नुकसान झाल्यानंतर ‘अशी’ होती प्रतिक्रिया