भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये सुरू आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारतीय संघाची सुरुवात खुपच खराब झाली होती. भारतीय संघाने 9व्या षटकात अवघ्या 33 धावांवर 3 विकेट गमावल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता.
याबरोबरच, रोहित शर्माने बरेच दिवस कसोटी क्रिकेटमध्ये अर्धशतकही केले नव्हते. तसेच 20 जुलै 2023 रोजी रोहितने पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध 57 धांवाची खेळी खेळली होती. आता येथे राजकोटमध्ये चार कसोटी सामने आणि 8 डावांनंतर रोहितने अर्धशतक केले आहे. तसेच रोहित शर्माचे कसोटी कारकिर्दीतील 17 वे अर्धशतक आहे. यासह रोहित शर्मा सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीसारख्या दिग्गजांच्या यादीत समावेश आहे.
अशातच, राजकोट कसोटीत रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या आहेत. विशेष म्हणजे इंग्लंडविरुद्ध तिन्ही फॉरमॅटमध्ये 2000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो खेळाडू ठरला. या प्रकरणात तो भारताचा 9वा फलंदाज ठरला आहे.
दरम्यान, यशस्वी जैस्वाल चांगल्या फॉर्ममध्ये होता. पण या सामन्यात त्याची बॅट चालली नाही. पण शुभमन गिलला 9 चेंडूत एकही धाव करता आली नाही आणि तो मार्क वुडचा बळी ठरला. याशिवाय विशाखापट्टणममध्ये पदार्पणाची संधी मिळालेला रजत पाटीदार काही विशेष करू शकला नाही. राजकोटमध्ये तो पहिल्या डावात 5 धावा करून टॉम हार्टलीचा शिकार ठरला आहे.
5⃣0⃣ for captain Rohit Sharma! 👏 👏
His 17th Test fifty as #TeamIndia move past 80.
Follow the match ▶️ https://t.co/FM0hVG5pje#TeamIndia | #INDvENG | @ImRo45 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/fOrJssYKcs
— BCCI (@BCCI) February 15, 2024
घ्या जाणून इंग्लंडविरुद्ध तिन्ही फॉरमॅटमध्ये 2000 धावा करणारे भारतीय फलंदाज –
सचिन तेंडुलकर- 3990
विराट कोहली- 3970
एमएस धोनी- 2999
राहुल द्रविड- 2993
सुनील गावसकर- 2919
मोहम्मद अझरुद्दीन- 2189
युवराज सिंग- 2154
दिलीप वेंगसरकर- 2115
रोहित शर्मा- 2000+
Greatest there was
Greatest there is
Greatest there will beA comeback knock from Goat Rohit Sharma 🐐
Continue this Rohit Bhai #RohitSharma pic.twitter.com/AzezmzhiaI
— Xyro_45 (@XyroRoFan) February 15, 2024
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा.
महत्वाच्या बातम्या –
- IND vs ENG : सरफराज खानला कॅप देताना अनिल कुंबळेचे वक्तव्य व्हायरल; म्हणाले,’सरफू…
- Ind vs Eng : BCCIने कसोटी मालिकेदरम्यान ‘या’ खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता; आता खेळणार ‘या’ संघाकडून