भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी समान्याला आजपासून सुरुवात झाली आहे. तर भारताने नाणेफेक जिंकून सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या यासोबत संघात चार मोठे बदल करण्यात आले आहे. सर्फराज आणि ध्रुव जुरेल आंतरराष्ट्रीय पदार्पण करत आहेत. याबरोबरच, अनिल कुंबळेने पदार्पणाची कॅप सरफराजला दिली. त्याचवेळी दिनेश कार्तिकने ध्रुवला पदार्पणाची कॅप दिली आहे.
याबरोबरच, कसोटीत भारतीय संघाकडून खेळणारा सर्फराज हा 311 वा तर ध्रु 312 वा खेळाडू आहे. सर्फराजला जेव्हा पदार्पणाची कॅप दिली जात होती, तेव्हा त्याचे प्रशिक्षक आणि वडील नौशाद खानही तिथे उपस्थित होते. तसेच सर्फराज खानला टेस्ट कॅप देताना अनिल कुंबळे यांचे वक्तव्य सोशल मिडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
सर्फराज खानला टेस्ट कॅप देताना अनिल कुंबळे म्हणाले आहेत की, ‘सरफू, मला तुझा आणि ज्या पद्धतीने तू इथपर्यंत पोहोचला आहेस त्याचा मला अभिमान आहे. मला खात्री आहे की तुम्ही जे काही साध्य केले आहे त्याचा तुमच्या वडिलांना आणि कुटुंबाला अभिमान वाटेल. तसेच तु कठोर परिश्रम केले आहेत आणि वाटेत तुला अनेक वेळा निराश झाला होता. पण मला खात्री आहे की आजचा दिवस तुमच्यासाठी खूप संस्मरणीय असणार आहे. तुमच्या आधी भारतासाठी फक्त 310 जण कसोटी क्रिकेट खेळू शकले आहेत. ही टोपी तुमच्यासाठी आहे.
याबरोबरच, ध्रुव जुरेलला कसोटी कॅप देताना दिनेश कार्तिक म्हणाला आहे की, ‘सर्वप्रथम, मला ही संधी दिल्याबद्दल मी रोहित शर्मा आणि राहुल द्रविडचा आभारी आहे. मी या खास प्रसंगी येथे येण्यास आणि कसोटी कॅप देण्यास पात्र आहे. तुम्ही याआधी अनेकदा निळ्या रंगात खेळलात, पण पांढऱ्या रंगाची जर्सी घालणे ही एक वेगळीच भावना असते. हा क्रिकेटचा सर्वात कठीण फॉरमॅट आहे. या फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करून तुम्हाला खूप समाधान मिळेल.
From The Huddle! 🔊
A Test cap is special! 🫡
Words of wisdom from Anil Kumble & Dinesh Karthik that Sarfaraz Khan & Dhruv Jurel will remember for a long time 🗣️ 🗣️
You Can Not Miss This!
Follow the match ▶️ https://t.co/FM0hVG5X8M#TeamIndia | #INDvENG | @dhruvjurel21 |… pic.twitter.com/mVptzhW1v7
— BCCI (@BCCI) February 15, 2024
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
महत्वाच्या बातम्या –
- WPL 2024 : गुजरातने अचानक बदलला कर्णधार, ‘या’ खेळाडूकडे दिली धूरा
- Ind vs Eng : तिसऱ्या कसोटीत होणार विक्रमांचा विक्रम! अश्विन 500 तर अँडरसन 700 खेळाडूंची करणार शिकार