राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यासाठी भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले आहेत. तसेच भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु पहिल्या अर्धातासामध्ये प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय चुकीचा ठरला आहे. कारण भारतीय संघाला यशस्वी जयसवाल,शुभमन गिल आणि रजत पाटीदारच्या रूपाने तीन मोठे धक्के बसले आहेत.
याबरोबरच, रविचंद्रन अश्विन आणि बेन स्टोक्ससाठी हा सामना खूप खास असणार आहे. कारण हे दोन्ही खेळाडू कसोटी विक्रम करण्याच्या अगदी जवळ आहेत. तसेच टीम इंडिया सर्फराज खान आणि ध्रुव जुरेलला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे.
तसेच या सामन्यात दोन्ही संघांचे खेळाडू मोठे विक्रम आपल्या नावावर करू शकतात. भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन 500 विकेट्सपासून फक्त एक पाऊल दूर आहे. त्याचबरोबर इंग्लंडचा महान गोलंदाज जेम्स अँडरसन 700 बळी घेणारा तिसरा गोलंदाज बनू शकतो. याशिवाय स्टोक्स कारकिर्दीतील 100 वा सामना खेळणार आहे.
आत्तापर्यंत स्टोक्सने कसोटी क्रिकेटमध्ये 6000 हून अधिक धावा केल्या आहेत आणि आता तो 200 कसोटी विकेट्स पूर्ण करण्याच्या अगदी जवळ आहे. तर स्टोक्सने 179 डावात 6251 धावा केल्या आहेत. यासोबतच १९७ विकेट्सही घेतल्या आहेत. 200 विकेट्स पूर्ण करण्यासाठी त्याला तीन विकेट्सची गरज आहे. स्टोक्सची कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम धावसंख्या २५८ धावा आहे.
तर दुसरीकडे इंग्लंडचा सर्वात अनुभवी खेळाडू जिमी अँडरसन ७०० कसोटी बळींपासून फक्त ५ विकेटस् लांब आहे. तसेच वयाची चाळिशी पार करूनही अँडरसन अजूनही जोमाने कसोटी क्रिकेट खेळतो आहे. तसेच भारताचा रवीचंद्रन अश्विन ५०० कसोटी विकेट्सच्या अगदी उंबरठ्यात उभा आहे. आत्तापर्यंत रवीचंद्रन अश्विनने ४९९ विकेट्स घेतल्या आहेत.
दरम्यान, 5 सामन्यांची कसोटी मालिका ही 1-1 ने बरोबरीत आहे. इंग्लंडने हैदराबादमधील पहिला सामना जिंकत विजयी सुरुवात केली. तर त्यानंतर टीम इंडियाने विशाखापट्टणममध्ये इंग्लंडवर मात करत हिशोब बरोबर केला. त्यानंतर आता तिसरा सामना जिंकून दोन्ही संघांचा मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे आता तिसरा सामना कोणती टीम जिंकते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
- IND vs ENG 3rd Test : तिसऱ्या कसोटीत मार्क वुडचा कहर; पहिल्या अर्धा तासात भारताला तीन मोठे धक्के
- Ind vs Eng : शेवटी बापचं..! कसोटीत पदार्पण झाल्यानंतर सर्फराजच्या आई-वडिलांना अश्रू अनावर – पाहा व्हिडिओ