IND vs ENG 3rd Test : आज राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यासाठी भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले आहेत. तसेच भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. याबरोबरच, भारतीय संघाला पहिल्या पहिल्या अर्धा तासात यशस्वी जयसवाल आणि शुभमन गिलच्या रूपनाने दोन धक्के बसले आहेत. तर सध्या क्रीजवर रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा खेळत आहे. तसेच राजकोटच्या या मैदानावर मार्क वुडचा कहर पाहिला मिळत आहे.
एकीकडे इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स १०० वा कसोटी सामना खेळत आहे, तर दुसऱ्या बाजूला भारतीय संघाची मधली फळी नवख्या फलंदाजांची आहे. रजत पाटीदार गेल्या सामन्यात आपला पहिला सामना खेळला होता, तर आज सर्फराझ खान आणि यष्टीरक्षक फलंदाज म्हणून ध्रुव जुरेलला पदार्पणाची संधी मिळाली आहे. या नव्या पिढीवर भारतीय संघाची मोठी जबाबदारी असणार आहे.
तसेच, तिसऱ्या कसोटीत सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच, भारतीय संघात चार बदल करण्यात आले आहेत. तर सर्फराज आणि यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल भारताकडून या कसोटीत पदार्पण करत आहेत. दोघांचे हे आंतरराष्ट्रीय पदार्पण आहे. अनिल कुंबळेने पदार्पणाची कॅप सरफराजला दिली. त्याचवेळी दिनेश कार्तिकने ध्रुवला पदार्पणाची कॅप दिली आहे.
दरम्यान, कसोटीत भारताचे प्रतिनिधित्व करणारा सर्फराज हा 311 वा तर ध्रु 312 वा खेळाडू आहे. सर्फराजला जेव्हा पदार्पणाची कॅप दिली जात होती, तेव्हा त्याचे प्रशिक्षक आणि वडील नौशाद खानही तिथे उपस्थित होते.
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा.
महत्वाच्या बातम्या –
- Ind vs Eng : शेवटी बापचं..! कसोटीत पदार्पण झाल्यानंतर सर्फराजच्या आई-वडिलांना अश्रू अनावर
- Ind vs Eng : तिसऱ्या कसोटीत सामन्यात टीम इंडियाचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, अखेर सर्फराज खान अन् ध्रुव जुरेल यांचे पदार्पण