महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तसेच वूमेंस आयपीएलच्या दुसऱ्या सीझनसाठी म्हणजेच WPL 2024 साठी 9 डिसेंबर रोजी मुंबईत महिला प्रीमियर लीग 2024 साठी खेळाडूंचा लिलाव पार पडला होता. तसेच महिला प्रीमियर लीगचा दुसरा हंगामान 23 फेब्रुवारीपासून बेंगळुरूमध्ये रंगणार आहे. यावेळी लीगचे सामने दोन टप्प्यात खेळले जाणार आहेत. पहिला टप्पा बेंगळुरू आणि दुसरा टप्पा दिल्लीत होणार आहे.
याबरोबरच, महिला प्रीमियर लीग 2024 मध्ये पाच संघांमध्ये एकूण 22 सामने खेळले जातील. ही लीग सुरू होण्यापूर्वी गुजरात जायंट्स संघात मोठा बदल करण्यात आला आहे. गुजरात जायंट्सने नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे. महिला प्रीमियर लीग 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाची फलंदाज बेथ मुनी गुजरात जायंट्स संघाचे नेतृत्व करणार आहे.
तर भारतीय अष्टपैलू स्नेह राणा उपकर्णधार असणार आहे. तसेच WPL च्या पहिल्या हंगामात मुनीची गुजरात जायंट्स संघाच्या कर्णधारपदी नियुक्त करण्यात आले होते. पण, दुखापतीमुळे तिला पहिल्या सामन्यानंतर स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. यानंतर स्नेह राणाने संपूर्ण हंगामात संघाचे नेतृत्व केले होते.
WPL च्या दुसऱ्या हंगामात गुजरात जायंट्स 25 फेब्रुवारीला बेंगळुरूमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. तसेच ऑस्ट्रेलियासाठी तिन्ही फॉरमॅट खेळलेल्या मुनीने कर्णधार बनवल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तसेच ती म्हणाली आहे की, ‘गुजरात जायंट्ससोबत परत आल्याने मला आनंद झाला आहे आणि संघाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी कृतज्ञ आहे. तसेच आमच्याकडे एक उत्तम संघ आहे आणि मला विश्वास आहे की आम्ही चांगली कामगिरी करू.
You can bet on Beth! 🤩#GiantArmy, Mooney Mania maate તૈયાર cho?💥#BringItOn #GujaratGiants #Adani pic.twitter.com/4OngbS92I0
— Gujarat Giants (@Giant_Cricket) February 14, 2024
दरम्यान, बेथ मुनी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. 2014, 2018, 2020 आणि 2023 मध्ये टी-20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघांचा भाग असण्याव्यतिरिक्त, ती 2022 ODI वर्ल्ड कप आणि 2022 च्या बर्मिंगहॅममधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या संघांमध्ये होती. तसेच डिसेंबर 2017 मध्ये तिने ICC T20I प्लेयर ऑफ द इयर आणि इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर असे दोन्ही पुरस्कार जिंकले आहे.
WPL 2024 साठी गुजरात जायंट्स संघ : ऍशले गार्डनर, बेथ मूनी, दयालन हेमलता, हरलीन देओल, लॉरा वोल्वार्ड, शबनम शकील, स्नेह राणा, तनुजा कंवर, फोबी लिचफिल्ड, मेघना सिंग, त्रिशा पूजाता, काश्वी गौतम, प्रिया मिश्रा, लॉरेन चीटल, कॅथरीन कृष्णा ब्रायस, मनीषा कश्मीर , तरन्न्नुम पठाण.
महत्वाच्या बातम्या –
- IND vs ENG 3rd Test : तिसऱ्या कसोटीत मार्क वुडचा कहर; पहिल्या अर्धा तासात भारताला तीन मोठे धक्के
- Ind vs Eng : शेवटी बापचं..! कसोटीत पदार्पण झाल्यानंतर सर्फराजच्या आई-वडिलांना अश्रू अनावर – पाहा व्हिडिओॉ