रोहित शर्माच्या फलंदाजीबद्दल सर्वांनाच माहिती आहे, तो जेव्हा फॉर्ममध्ये असतो तेव्हा तो एकेरी आणि दुहेरीपेक्षा चौकार आणि षटकारांमध्ये अधिक व्यवहार करत असतो. त्यामुळे त्याच्या बेधडक फलंदाजीमुळे गोलंदाजांची अवस्थाही बिकट होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांपैकी एक असलेल्या रोहित शर्माने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
तसेच रोहित शर्माने हा रेकॉर्ड धर्मशाला येथे खेळल्या जात असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात त्याने षटकार ठोकून हा विक्रम केला आहे. तसेच धरमशाला कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी रोहित शर्माने नाबाद 52 धावा केल्या आहेत.
खरं तर, धरमशाला कसोटी सामन्यात रोहितने पहिला षटकार ठोकताच, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात 50 षटकार पूर्ण करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. याशिवाय, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात 50+ षटकार ठोकणारा रोहित जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या नावावर असून त्याने आतापर्यंत 78 षटकार मारले आहेत.
दरम्यान, पाचव्या कसोटी सामन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या दिवशी भारताने इंग्लंडचा पहिला डाव 218 धावात संपुष्टात आणत दिवसअखेर भारतीय संघाने 1 बाद 135 धावा केल्या आहेत. तसेच पहिल्या डावात भारत अजूनही 83 धावांनी पिछाडीवर आहे. त्याआधी भारताकडून दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतकीय खेळी केल्या आहेत. यामध्ये जयस्वालने 57 धावाकाडून बाद झाला आहे. तर रोहित शर्माने नाबाद 52 धावांवर खेळत आहे.
धरमशाला कसोटीसाठी दोन्ही संघ –
भारताची प्लेइंग इलेव्हन – यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल (पदार्पण), रविंद्र जडेजा, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन – झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), टॉम हार्टले, मार्क वुड, जेम्स अँडरसन, शोएब बशीर.
महत्वाच्या बातम्या –
- IND Vs ENG : मुशीर खानने सरफराज खानचे गुपित केले उघड, सांगितला आऊट करण्याचा प्लन,’ म्हणाला..
- WPL 2024 : मुंबई इंडियन्सने टॉस जिंकत घेतली फलंदाजी, पाहा प्लेइंग 11