भारत विरुद्ध इंग्लंड पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना रांची येथे खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 353 धावा फलकावर लावल्या आहेत.अनुभवी फलंदाज जो रूटने शतक ठोकत इंग्लिश संघाला ही धावसंख्या गाठण्यात मोलाचा वाटा उचलला. भारताचा पहिला डाव तिसऱ्या दिवशी 307 धावांवर आटोपला होता. त्यानंतर इंग्लंड दुसऱ्या डावात 46 धावांची आघाडी मिळाली होती.
यानंतर 19 धावांवर इंग्लंडला दोन धक्के बसले आहे. अश्विनने इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील पाचव्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर दोन विकेट् घेतल्या होत्या. तर चहापानापर्यंत इंग्लंडने दुसऱ्या डावात पाच गडी गमावून 120 धावा केल्या होत्या. यानंतर टी-ब्रेकनंतर लगेचच इंग्लंडला सहावा धक्का बसला. जडेजाने जॉनी बेअरस्टोला आऊट केले. त्याला 30 धावा करता आल्या आहेत.
याबरोबरच, कुलदीप यादवच्या फिरकीची जादू चालली अलून त्याने एकाच षटकात इंग्लंडच्या दोन शिकार केल्या. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर कुलदीपने टॉम हार्टलीला तर शेवचच्या चेंडूवर ओली रॉबिन्सन एलबीडब्ल्यू आऊट झाला. हार्टलीला सात धावा करता आल्या. त्याचवेळी रॉबिन्सनला खातेही उघडता आले नाही. कुलदीपने चार विकेट घेतल्या आहेत. तर अश्विनने पाच विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे इंग्लंडचा संपूर्ण संघ 145 धावांवर सर्वबाद झाला आहे.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन आणि शोएब बशीर.
महत्वाच्या बातम्या –
- IPL 2024 : राजस्थान रॉयल्सला IPL 2024 पूर्वी मोठा धक्का! घरचे मैदान खेळण्यासाठी बंद? कारण जाणून व्हाल थक्क
- IND vs ENG : अंपायर्स कॉल वरून वाद! गिलपासून आकाशदीपपर्यंत अंपायर्सनी लावली भारताची वाट