बीसीसीआयने गुरुवारी 22 फेब्रुवारीला आयपीएल 2024 च्या पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचा हा पहिला टप्पा जाहीर करण्यात आला. वेळापत्रकात एक गोष्ट पूर्णपणे वेगळी होती. ती म्हणजे राजस्थान रॉयल्स संघाचे घरचे मैदान असलेल्या सवाई मानसिंग स्टेडियमला नवीन हंगामाच्या जवळपास महिनाभर आधी सील करण्यात आले आहे.
याबरोबरच, IPL 2024 चा पहिला सामना 22 मार्च रोजी होणार आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. हे चेन्नईत होणार आहे. यानंतर 24 मार्च रोजी राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. पण हा सामना जयपूरमध्ये होणार आहे पण त्याआधी जयपूरचे सवाई मान सिंह स्टेडियम सील करण्यात आले आहे. त्याचे मोठे कारण आता समोर आले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राज्य क्रिकेट संस्थेवर कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे ज्यामुळे राजस्थान क्रीडा परिषदेने राजस्थान क्रिकेट असोसिएशनसह सवाई मानसिंग स्टेडियम सील करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राजस्थान क्रीडा परिषदेचे सचिव सोहन राम चौधरी यांनी सांगितले आहे की, आम्ही आरसीएला अनेक नोटिसा पाठवल्या होत्या. पण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी केवळ एमओयूची वेळ वाढवून देण्याचे उत्तर दिले. त्याच्याकडे काही जबाबदाऱ्या होत्या आणि त्याने त्या पूर्ण केल्या नाहीत.
https://twitter.com/rajasthanroyals/status/1760637715849376041
दरम्यान, यावर तोडगा काढण्यासाठी आपण आरसीएसोबत बसलो पण हे पाऊल उचलावे लागले असे त्यांनी सांगितले आहे. तसेच त्यांना सुमारे 200 कोटी रुपये मिळाले, मात्र आम्हाला ती रक्कम मिळाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. राजस्थान प्रीमियर लीग दरम्यान त्यांच्याकडे भरपूर पैसे होते पण त्यांनी एमओयूचे पालन केले नाही आणि पैसे जमा केले नाहीत. त्यामुळेच आम्हाला हे पाऊल उचलावे लागले आहे.
महत्वाच्या बातम्या –
- IND vs ENG : अंपायर्स कॉल वरून वाद! गिलपासून आकाशदीपपर्यंत अंपायर्सनी लावली भारताची वाट
- IND vs ENG : आर अश्विनने भारतीय भूमीवर केला ऐतिहासिक पराक्रम! मोडला अनिल कुंबळेचा विक्रम