इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने 106 धावांनी विजय मिळवला. यशस्वी जयस्वास, शुबमन गिल आणि जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विन या खेळाडूंची विजयातील भूमिका महत्वाची ठरली. पहिल्या डावात 6, तर दुसऱ्या डावात तीन विकेट्स घेणारा जसप्रीत बुमराह सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. पुरस्कार मिळाल्यानंतर बुमराहने रोहित शर्माचा उल्लेख करत खास किस्साही सांगितला.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला पराभव मिळाला होता. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने 106 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. उभय संघातील पुढचे तीन कसोटी सामने रोमांचक ठरणार आहेत. विशाखापट्टणममध्ये पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमरहा संघासाठी मॅच विनर ठरला. बुमराहने या सामन्यात एकूण 9 विकेट्स घेतल्या. सामन्यात त्याने काही फलंदाजांना घातक यॉर्कर टाकून त्रिफलाचीत देखील केले.
सामना संपल्यानंतर त्याला पहिल्या डावात ओली पोप (Oli Pope) याला टाकलेल्या यॉर्कर चेंडूवरबाबत प्रश्न विचारला गेला. यावर वेगवान गोलंदाज म्हणाला, “युवा खेळाडू असताना मी सर्वात पहिला चेंडू टाकायला शिकलो, तो यॉर्करच. मला वाटायचे की विकेट घ्यायची असेल, तर हाच चेंडू टाकला पाहिजे. त्यावेळी मी वसीम अक्रम, वकार युनिस आणि जहीर खान यांना पाहायचो.”
Bumrah said “No competition with any bowler, because I used to watch only fast bowlers as a kid, that give me happiness so if a fast bowler is doing well then kudos to them”. [Talking about the battle with Anderson] pic.twitter.com/fATIqIauVh
— Johns. (@CricCrazyJohns) February 5, 2024
जसप्रीत बुमराह सध्या भारतीय संघाचा नियमित गोलंदाज आहे. पण त्याचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्याने कारकिर्दीतील प्रत्येक टप्प्यावर स्वतःला सिद्ध केल्यानंतर त्याला ही संधी दिली गेली आहे. रोहित शर्मा या प्रवासात बुमराहला जवळून पाहत होता आणि त्याला पाठीपा देखील देत होता. मुंबई इंडियन्सकडून आयपीएल खेळतानाच बुमराहचा दर्जा देशासमोर आला. कर्णधार रोहित याची नेहमी त्यासा साथ मिळाली. याच पार्श्वभूमीवर बुमरहा सोमवारी (5 फेब्रुवारी) सामना संपल्यानंतर म्हणाला, “त्याने माझ्यात झालेला बदल पाहिला आहे. मी एक युवा खेळाडू होतो तेव्हापासून ते कसोटी संघाचा नियमित खेळाडू असेपर्यंत.”
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, इंग्लंड संघ शेवटच्या डावात 399 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आला. पण भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला 69.2 षटकात 292 धावांवर सर्वबाद केले. तत्पूर्वी पहिल्या डावात इंग्लंड संघ 253 धावांवर सर्वबाद झाला होता. भारताने आपल्या पहिल्या डावात 396, तर दुसऱ्या डावात 255 धावा केल्या होत्या. (IND vs ENG. Bumrah talked about yorkers after England’s defeat, also mentioned Rohit Sharma)
महत्वाच्या बातम्या –
Safa Baig’s Face । इरफान पठाणमे पूर्ण केली चाहत्यांची इच्छा, खास दिवशी पहिल्यांदाच दाखवला पत्नीचा चेहरा
न्यूझीलंड-ऑस्ट्रेलियानंतर आता इंग्लंडविरुद्ध अश्विन सर्वात यशस्वी गोलंदाज, मोठा विक्रम केला नावावर