---Advertisement---

IND vs ENG: संघाला मोठा धक्का! ‘हा’ वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर!!

On: शुक्रवार, ऑगस्ट 1, 2025 2:34 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या ओव्हल कसोटी सामन्यात इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. अनुभवी अष्टपैलू क्रिस वोक्स डाव्या खांद्याच्या दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटीतील उर्वरित खेळातून बाहेर पडला आहे. पहिल्या दिवसाच्या खेळादरम्यान सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना त्याच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली.

या मालिकेत सातत्याने प्रभावी कामगिरी करणारा वोक्स हा इंग्लंडसाठी सर्व पाच कसोट्यांमध्ये सहभागी झालेला खेळाडूंपैकी एक होता. त्याच्या गैरहजेरीमुळे इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजी विभागावर मोठा ताण येणार आहे. आता गस अ‍ॅटकिन्सन, जोश टंग आणि जेमी ओव्हरटन यांच्यावर संघाचा भार पडणार येईल.

पहिल्या दिवशी वोक्सने दुखापतीनंतर 14 षटके टाकली, त्यापैकी त्याने एक ओव्हर मेडन टाकली, तर 46 धावा देऊन एक विकेट घेतली. त्याने केएल राहुलला आऊट केले. केएल राहुल कट मारण्याचा प्रयत्न करत असताना आऊट झाला. चेंडू खाली पडला आणि त्याच्या पायाला लागला आणि नंतर स्टंपला लागला. मालिकेबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 11 विकेट्स घेतल्या आहेत आणि 181 ओव्हर्स टाकल्या आहेत, जे मालिकेतील कोणत्याही वेगवान गोलंदाजाने टाकलेले सर्वाधिक षटके आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---