भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा वनडे सामना आज (09 फेब्रुवारी) खेळला जात आहे. हा सामना कटकमध्ये रंगत आहे. या सामन्यात इंग्लंडच्या कर्णधाराने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे झाल्यास भारतीय संघात विराट कोहलीचा समावेश करण्यात आला आहे. विराट परतल्याने यशस्वी जयस्वाल बाहेर पडला आहे. पहिल्या सामन्यात विराट कोहली गुडघ्याच्या दुखापतीमुळे खेळला नव्हता. तर कुलदीप यादवला वगळून वरुण चक्रवर्तीचा समावेश करण्यात आला आहे
मालिकेतील पहिल्या नागपूर सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला सहज पराभव केला. ज्यामध्ये टीम इंडियाकडून शुबमन गिलने मॅच विनिंग खेळी खेळली. या विजयासह भारत आता 1-0 ने आघाडीवर आहे. आता आजचा सामना जिंकून टीम इंडिया मालिका खिश्यात टाकण्याचा प्रयत्न करेल. तर इंग्लंड मालिका बरोबरी करण्यासाठी मैदानात उतरेल.
दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन-
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती
इंग्लंड: फिलिप साल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, गस अॅटकिन्सन, आदिल रशीद, मार्क वूड, साकिब महमूद
हेही वाचा-
SA20 Final; क्रिकेटसाठी या खेळाडूनं लग्न पुढे ढकललं, पण ट्रॉफीच्या स्वप्नावर पाणी!
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का! रचिन रवींद्र भर मैदानात रक्तबंबाळ