इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर आहे. लवकरच दोन्ही संघांमध्ये स्पर्धात्मक क्रिकेट पाहायला मिळणार आहे. या दोन्ही संघांमध्ये पहिले 5 टी20 सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर पुढील महिन्यापासून 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. टी20 मालिकेतील पहिला सामना 22 जानेवारीपासून कोलकाता मधील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दरम्यान, इंग्लंडने दौरा सुरू होण्यापूर्वी एक मोठी घोषणा केली आहे. पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये त्यांचा नवीन उपकर्णधार जाहीर केला आहे. इंग्लंडने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये हॅरी ब्रूकला उपकर्णधार म्हणून नियुक्त केले आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) भारताविरुद्धच्या आगामी पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेट मालिकेसाठी हॅरी ब्रूकला ही महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. इंग्लंड भारताविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे आणि त्यानंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. भारताविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या टी20 ब्रूक इंग्लंडकडून उपकर्णधाकर म्हणून खेळताना दिसेल.
Harry Brook appointed Vice Captain of the England white ball team. pic.twitter.com/2yyGDr0VIG
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 21, 2025
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी ब्रूकला यापूर्वी संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. इंग्लंडने मालिका 2-3 अशी गमावली पण ब्रूकने पाच सामन्यांमध्ये 300 पेक्षा जास्त धावा केल्या.
टी20 मालिकेसाठी दोन्ही संघ पुढीलप्रमाणे
भारत: सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, नितीश रेड्डी, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, ध्रुव जुरेल, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती आणि वॉशिंग्टन सुंदर.
इंग्लंड: जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल साल्ट, मार्क वूड.
हेही वाचा-
IND VS ENG: टी20 क्रिकेटमध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड
‘हा जगाने पाहिलेला सर्वात महान व्हाईट बॉल क्रिकेटपटू …’, माजी कर्णधाराकडून विराटची पाठराखण?
नाशिकमध्ये क्रिकेटचा मोठा सामना, भारतीय क्रिकेटर दिसणार ॲक्शनमध्ये