इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात तीन वनडे सामन्याची मालिका सुरू आहे. यातील पहिला वनडे सामना केनिंग्टन, द ओव्हल येथे झालेल्या सामन्यात भारताने १० विकेट्सने मोठा विजय मिळवला आहे. यामुळे भारतीय संघ या मालिकेत १-० असा आघाडीवर आहे. या मालिकेतील दुसरा सामना १४ जुलैला लॉर्ड्सवर खेळला जाणार आहे. भारताची या मैदानावरील कामगिरी नेहमीच विशेष ठरली आहे.
भारतीय संघ विश्वविजेता पहिल्यांदा याच मैदानावर बनला होता. इंग्लंड विरुद्धचा नॅटवेस्ट ऐतिहासिक अंतिम सामनाही या मैदानावर खेळला गेला होता. त्याकाळी सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या संघाने तो सामना जिंकला होता. भारत द ओव्हलवर ज्याप्रकारे खेळली आहे, त्यावरून येथे होणारा दुसरा वनडे सामना रोमांचक ठरणार आहे.
लॉर्ड्सवर इंग्लंड आणि भारत संघांची कामगिरी-
भारतीय संघ या मैदानावर आतापर्यंत ८ सामने खेळला आहे. त्यातील ४ सामने जिंकले असून ३ सामन्यांमध्ये पराभव स्विकारावा लागला आहे. तर एक सामना अनिर्णीत राहिला होता. दुसरीकडे इंग्लंडच्या संघाने या मैदानावर ५६ सामने खेळले आहेत. त्यातील २५ सामन्यात ते जिंकले, तर २७ सामन्यात पराभूत झाले होते. त्यातील ४ सामने अनिर्णीत राहिले आहेत. भारतीय संघाला आगामी दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याची संधी आहे, तर यजमान संघाचा सामना जिंकत मालिकेत परतण्याचा हेतू असणार आहे.
लॉर्ड्सवर इंग्लंड-भारत आमनेसामने-
वनडेमध्ये इंग्लंड आणि भारत ७ वेळा या मैदानावर समोरासमोर आले आहेत. त्यातील दोन्ही संघानी प्रत्येकी ३-३ सामने जिंकले असून एक सामना अनिर्णीत राहिला आहे. भारताने ५ सप्टेंबर, २००४मध्ये शेवटी या मैदानावर विजय मिळवला होता. गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाने तो सामना २३ धावांनी जिंकला होता.
भारत आणि इंग्लंड २०१८ला झालेल्या सामन्यात या मैदानावर आमने-सामने आले होते. हा सामना यजमान संघाने जिंकला होता. त्यामध्ये इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ७ विकेट्स गमावत ३२२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ २३६च धावा करू शकली. या सामन्यात इंग्लकडून जो रुटने ११३ आणि इयोन मॉर्गनने ५३ धावा केल्या होत्या. भारताकडून या सामन्यात सर्वाधिक धावा सुरेश रैना आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी केल्या होत्या. त्यांनी अनुक्रमे ४६ आणि ४५ धावा केल्या होत्या. या सामन्यात कुलदिप यादवने ३ विकेट्स घेतल्या होत्या.
आता दोन्ही संघ वेगळे असून कोण या सामन्यात जिंकणार हे पाहण्याजोगे ठरणार आहे. भारताने पहिला सामना मोठ्या फरकाने जिंकल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. तर यजमान संघ हा सामना जिंकत मालिकेत परतण्याचा प्रयत्न करणार आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
किती गोड! रोहित शर्माने ‘त्या’ चिमुकलीची भेट घेत जिंकली मने, चॉकलेट आणि टेडीही दिला भेट
बुमराहसोबतच्या जुगलबंदीचे शमीने उलगडले रहस्य, आगामी सामन्यांसाठीची योजनाही केली स्पष्ट
‘एलेक्सा, प्लीज प्ले जसप्रीत बुमराह’, भारताच्या माजी क्रिकेटपटूच ट्वीट होतंय व्हायरल