---Advertisement---

IND vs ENG : भारताला आता ‘या’ दिग्गजाची कमी जाणवणार नाही! जयस्वालविषयी माजी कर्णधाराचे मोठे विधान

On: सोमवार, फेब्रुवारी 19, 2024 4:55 PM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतील चौथ्या दिवशी यशस्वी जयस्वालने धमाकेदार द्विशतक ठोकलं आहे. तसेच यशस्वीच्या कसोटी कारकीर्दीतील आणि इंग्लंड विरुद्धचं हे दुसरं द्विशतक ठरलं आहे. यशस्वीने हे दोन्ही द्विशतकं इंग्लंड विरुद्धच्या याच कसोटी मालिकेत झळकावली आहेत. तसेच यशस्वीने या द्विशतकी खेळीत मैदानात चौफेर फटेकबाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आहे. याबरोबरच यशस्वी जयस्वाल याने खेळीत 10 षटकार आणि 14 चौकारांच्या मदतीने 86.58 च्या स्ट्राईक रेटने हे द्विशतक केलं आहे. यामुळे इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने त्याला टीम इंडियाचा पुढचा वीरेंद्र सेहवाग असे म्हटले आहे.

याबरोबरच, राजकोट कसोटीत यशस्वीने द्विशतक पूर्ण करताच मायकल वॉनने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत त्याने म्हंटले आहे की, ‘भारताकडे आता एक नवा सेहवाग आहे. तर यशस्वी हा एक असा फलंदाज आहे जो क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये विरोधी गोलंदाजी आक्रमण पुर्णपणे नष्ट करेल, जसे वीरू करत होता. तसेच वीरेंद्र सेहवाग त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी देखील ओळखला जात होता. कसोटी क्रिकेटमध्येही तो खूप वेगवान फलंदाजी करत होता.

वीरेंद्र सेहवागने सलामीवीर अनेक स्फोटक खेळी खेळल्या आहेत. यामध्ये टीम इंडियाने अनेक सामने देखील जिंकले आहेत. मात्र सेहवागच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाला त्याच्यातील पोकळी भरून काढू शकेल असा एकही फलंदाज अजून वरच्या फळीत सापडला नव्हता. पण आता यशस्वी ही प्रदीर्घ काळापासून असलेली उणीव पूर्ण करताना असताना पहायला मिळालं आहे.

तसेच यशस्वीने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत फक्त 7 कसोटी सामने खेळले असून या 7 सामन्यांमध्ये त्याने 2 अर्धशतके आणि 3 शतके झळकावली आहेत. तर त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिले शतक झळकावले होते, जेव्हा त्याने १७१ धावांची खेळी केली होती. यानंतर गेल्या सामन्यात त्याचे दुसरे शतक झळकले. यशस्वीने विशाखापट्टणम कसोटीत २०९ धावांची इनिंग खेळली होती. तसेच आता राजकोटमध्येही या युवा फलंदाजाने आपल्या तिसऱ्या शतकाचे दुहेरी शतकात रूपांतर केले आहे.

दरम्यान कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कसोटी मालिकेत २० षटकार मारण्याचा विक्रम करणारा यशस्वी पहिला फलंदाज ठरला आहे. यासोबतच एका डावात सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या विक्रमाचीही बरोबरी त्याने यावेळी केली आहे. त्यामुळे तो वीरेंद्र सेहवागची जागा घेणार असल्याचे मानले जात आहे.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---