भारतीय संघाने तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडवर ४३४ धावांनी दणदणीत विजयाची नोंद करून मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. तर या सामन्यात शतक व पाच विकेट्स घेणाऱ्या रविंद्र जडेजाला प्लेअर ऑफ दी मॅचच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तसेच टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 557 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने इंग्लंडला या विजयी धावांचा पाठलाग करताना 39.4 ओव्हरमध्ये 122 धावांवर गडगडला आहे. तर दुसऱ्या डावात 5 विकेट्स घेत आपण जगातील अव्वल दर्जाचा अष्टपैलू आहोत हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.
याबरोबरच, रवींद्र जडेजाला इंग्लंडविरुद्ध राजकोट येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीसाठी ‘प्लेअर ऑफ द मॅच’ चा पुरस्कार देण्यात आला होता. तो त्याने पत्नी रिवाबाला समर्पित केले आहे. याबरोबरच हा पुरस्कार पत्नीला समर्पित करणाऱ्या जडेजाच्या वडिलांनी रिवाबावर जादूटोण्याचे गंभीर आरोप केले होते.
यानंतर जडेजाने म्हंटले आहे की, ती मला ला मानसिकदृष्ट्या खंबीर राहण्यासाठी मदत केली आहे. तिने शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या देखील मदत केल्याचे जडेजाने सांगितले आहे. यानंतर जडेजा म्हणाला की, ‘दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेतल्याने मनात एक विशेष भावना आहे. एकाच सामन्यात शतक आणि पाच विकेट्स घेणं हे खास आहे.’ तसेच ‘माझ्या घरच्या मैदानावरचा हा सामनावीराचा पुरस्कार खास आहे. मी तो माझ्या पत्नीला समर्पित करतोय. पडद्यामागं ती मला मानसिक पाठबळ देते. ती कायम माझा आत्मविश्वास वाढवत असते.’
दरम्यान, नुकतेच जडेजाचे वडील अनिरुद्ध सिंह यांनी ‘दिव्य भास्कर’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, त्यांच्या सुनेने जडेजावर जादूटोणा केल्याचे त्यांना माहित नव्हते. तसेच अनिरुद्ध सिंगनेही सांगितले होते की, तो जडेजापासून वेगळा राहतो. मात्र, स्वतः जडेजाने सोशल मीडिया पोस्टद्वारे वडिलांचे हे गंभीर आरोप फेटाळून लावले होते.
महत्वाच्या बातम्या –
- IND vs ENG : इंस्टाग्रामवर अश्विनच्या पत्नीची इमोशनल पोस्ट; म्हणाली, आमच्या आयुष्यातील…
- IND Vs ENG : जसप्रीत बुमराहबाबत मोठी अपडेट, उपकर्णधार इंग्लंडविरुद्धच्या ‘या’ कसोटी सामन्यातून बाहेर