राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाने 434 धावांनी दमदार विजय मिळवला आहे. तसेच धावांच्या बाबतीत भारताचा हा सर्वात मोठा कसोटी विजय देखील ठरला आहे. याबरोबरच रतीय संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विनसाठी राजकोटचा सामना खूप खास होता. या सामन्यात त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत 500 कसोटी विकेट्स पूर्ण केल्या आहेत.
याबरोबरच हा कसोटी सामना फिरकीपटू आर अश्विनसाठी थोडासा खास आणि काहीसा तणावपूर्ण ठरला आहे. तसेच सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने झॅक क्रॉलीला बाद करून 500 कसोटी विकेट्स पूर्ण केल्या. मात्र अश्विनला आपला 500वा बळी मिळवल्यानंतर लगेचच आईच्या आजारपणामुळे सामना अर्ध्यावरच सोडावा लागला. त्यानंतर चौथ्या दिवशी टी ब्रेकनंतर तो मैदानात परतला आणि त्याने टॉम हार्टलीला बाद करत 501वी विकेट घेतली होती. त्यामुळे अश्विनची पत्नी प्रीती नारायण यांनी अश्विनच्या या कामगिरी बद्दल इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
इन्स्टाग्रामवर पोस्ट करत प्रीतीने लिहिले आहे की, “आम्ही हैदराबादमध्ये (पहिली कसोटी) 500 व्या विकेटचा पाठलाग करत होतो पण तसे झाले नाही. विशाखापट्टणम (दुसरी कसोटी) येथेही ते शक्य झालं नाही नाही. 499 झाल्यानंतर मी भरपूर मिठाई विकत घेतली आणि घरी सगळ्यांना वाटली. 500 वी विकेट आली आणि शांततेत निघून गेली. जोपर्यंत तसं होत नाही. 500 ते 501 च्या दरम्यान बरंच काही घडलं. आमच्या आयुष्यातील ते सर्वात कठीण 48 तास होते. पण हे सर्व 500व्या विकेटबद्दल आहे. आणि त्याआधीच्या सुमारे 499 बद्दल. काय अप्रतिम कामगिरी आहे. काय विलक्षण माणूस आहे. अश्विन, मला तुझा खूप अभिमान आहे आणि आम्ही तुझ्यावर प्रेम करतो!”
दरम्यान, कसोटीत 500 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारा अश्विन भारताचा दुसरा आणि नववा गोलंदाज आहे. अश्विनने मोठा इतिहास रचला आहे. सर्वात जलद 500 कसोटी बळी घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरला आहे. अनिल कुंबळे आणि शेन वॉर्न सारख्या दिग्गजांचा विक्रम त्याने मोडला आहे.
महत्वाच्या बातम्या –
- IND Vs ENG : जसप्रीत बुमराहबाबत मोठी अपडेट, उपकर्णधार इंग्लंडविरुद्धच्या ‘या’ कसोटी सामन्यातून बाहेर
- IND vs ENG : भारतीय संघ चौथ्या कसोटीत होणार आणखीन मजबूत, ‘या’ स्टार खेळाडूचे पुनरागमन