---Advertisement---

IND vs ENG : भारतीय संघ चौथ्या कसोटीत होणार आणखीन मजबूत, ‘या’ स्टार खेळाडूचे पुनरागमन

On: सोमवार, फेब्रुवारी 19, 2024 11:34 AM
KL-Rahul-Virat-Kohli
---Advertisement---

IND vs ENG : रोहित अँड कंपनीने तिसरा कसोटी सामना 434 धावांनी जिंकूण कसोटी क्रिकेटमधील टीम इंडियाने मिळवलेला सर्वात मोठा विजय ठरला आहे. टीम इंडियाने दुसरा डाव घोषित केल्यावर इंग्लंडला जिंकण्यासाठी 557 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 122 धावांवर ऑल आऊट झाला. इंग्लंडचा हा कसोटी क्रिकेट इतिहासातील दुसरा सर्वात मोठा पराभव झाला आहे. 

याबरोबरच भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाची उत्कृष्ट कामगिरी कायम आहे. राजकोटच्या मैदानावर भारतीय संघाने इंग्लंडचा ४३४ धावांनी पराभव करत मालिकेत 2-1 अशी आघाडी देखील घेतली आहे. मात्र, भारतीय संघाचा स्टार फलंदाज केएल राहुल दुखापतीमुळे राजकोट सामना खेळू शकला नाही. कर्णधार रोहित शर्माने रांची येथे होणाऱ्या चौथ्या कसोटीत पुनरागमन करण्यास सक्षम असेल की नाही याबाबत मोठे माहिती दिली आहे.

याबाबत रोहित शर्माला पत्रकार परिषदेत केएल राहुलची दुखापत आणि चौथ्या कसोटीत खेळण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना रोहित शर्मा म्हणाला आहे की, तो ठीक आहे. तसेच रोहितने दिलेल्या उत्तरावरून केएल राहुल दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे की नाही याबाबत अजूनही शंका वर्तवण्यात येत आहे.

तसेच केएल राहुल या मालिकेतील पहिला सामना खेळला होता. मात्र, या सामन्यानंतर तो जखमी झाला आणि विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून त्याला वगळण्यात आले होते. तसेच तिसऱ्या कसोटीपूर्वी राहुल पूर्णपणे बरा होईल, अशी चाहत्यांना आशा होती. मात्र, तसे न झाल्याने तो राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यातूनही बाहेर पडला होता.

दरम्यान, केएल राहुल रांची कसोटीतून भारतीय संघात पुनरागमन करण्यात यशस्वी ठरला तर रजत पाटीदारच्या जागी त्याचा समावेश केला जाऊ शकतो. तसेच रजत पाटीदारला आतापर्यंत आपल्या बॅटने मोठी खेळी खेळता आलेली नाही. अशा परिस्थितीत त्याच्या जागी राहुलचा प्लेइंग-11 मध्ये समावेश केला जाऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---