भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना हा रांची येथे होणार आहे. तसेच पाच सामन्याच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराहला चौथ्या कसोटीत विश्रांती देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. याबरोबरच भारताने तिसऱ्या कसोटीत इंग्लंडवर 434 धावांनी दणदणीत विजय मिळवत भारताचा कसोटी क्रिकेटमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला आहे.
याबरोबरच राजकोटमध्ये खेळलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराने फक्त दोनच विकेट घेतल्या होत्या. तसेच त्याने पहिल्या डावात भारतासाठी 26 धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती. यामुळे जसप्रीत बुमराहसाठी विश्रांती खूप गरजेती आहे. त्याने या मालिकेत जवळपास 81 षटके गोलंदाजी केली आहे. या मालिकेत दुसऱ्या सामन्यात मोहम्मद सिराजला विश्रांती देण्यात आली होती. त्याच्या जागी मुकेश कुमारला खेळवण्यात आलं होतं.
मात्र जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या मालिकेतील पाचही कसोटी सामने खेळणार नसल्याचे या मालिकेपूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते. तसेच मोहम्मद सिराजला मालिकेतील दुसऱ्या कसोटीतून विश्रांती देण्यात आली होती. त्यानंतर तो राजकोट कसोटीमध्ये संघाचा भाग झाला होता. रांची येथे खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटीसाठी मुकेश कुमार संघात येणार आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराहच्या जागी मुकेश कुमार प्लेइंग 11 चा भाग असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, जसप्रीत बुमराह राजकोटहून थेट अहमदाबादला रवाना होणार आहे. मात्र, जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त इतर कोणत्याही खेळाडूला रांचीमध्ये खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटीत विश्रांती दिली जाणार नाही. जसप्रीत बुमराहच्या कामाचा ताण हाताळण्यासाठी संघ व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे. जसप्रीत बुमराहने या मालिकेत 80.5 षटके टाकली आहे. त्यामध्ये त्याने 17 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- IND vs ENG : भारतीय संघ चौथ्या कसोटीत होणार आणखीन मजबूत, ‘या’ स्टार खेळाडूचे पुनरागमन
- महेंद्रसिंग धोनी ठरला IPL च्या इतिहासातील सर्वोकृष्ट संघाचा कर्णधार, पाहा संपूर्ण संघ