सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेची सुरुवात उत्तम प्रकारे केली. ज्यामध्ये टीम इंडियाने कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या मालिकेतील पहिला सामना 7 विकेट्सने जिंकला. या सामन्यात भारतीय खेळाडंनी अष्टपैलू कामगिरी केली. टीम इंडियाला आता या मालिकेतील पुढील सामना उद्या 25 जानेवारी रोजी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळायचा आहे. ज्याठिकाणाी जवळजवळ 7 वर्षांनी टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जात आहे. टीम इंडियाने आतापर्यंत या मैदानावर 2 टी20 सामने खेळले आहेत.
भारतीय संघाने 2018 मध्ये चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर शेवटचा सामना खेळला होता. तर या मैदानावर आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 2 टी20 सामन्यांमध्ये टीम इंडियाने एक जिंकला आहे आणि एक सामना गमावला आहे. भारतीय संघाने 2012 मध्ये चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध टी20 सामना खेळला. ज्यामध्ये त्यांना एका धावेने पराभव स्वीकारावा लागला. यानंतर, टीम इंडियाने 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध या मैदानावर शेवटचा सामना खेळला आणि तो 6 विकेट्सने जिंकला.
जर आपण चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवरील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या पाहिली तर ती सुमारे 150 धावा आहे. तर दुसऱ्या डावात या ठिकाणी दव पडण्याची शक्यता असते. ज्यामुळे लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला फायदा होतो. त्याच वेळी, चेन्नईच्या खेळपट्टीवरही फिरकी गोलंदाजांची जादू दिसून येते, जी इंग्लंड संघासाठी चांगली बातमी नाही. कारण पहिल्या टी20 सामन्यात त्यांचे फलंदाज वरुण चक्रवर्तीच्या चेंडूंचा सामना करण्यासाठी स्पष्टपणे संघर्ष करताना दिसले.
हेही वाचा-
दुसऱ्या डावातही भारतीय सलामीवीर फ्लाॅप, रणजीमध्येही रोहितच्या पदरी निराशाच.!
18व्या आयपीएल हंगामासाठी जाणून घ्या सर्व संघांचे संभाव्य यष्टीरक्षक!
IND vs ENG; अर्शदीप सिंग ठोकणार शतक, अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच भारतीय