आज बीसीसीआयने भारत आणि इंग्लंडविरूद्धच्या उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. तर या तीन कसोटी सामन्यांसाठी 18 खेळाडूंचा भारतीय संघात समावेश देखील करण्यात आला आहे. तसेच या संघात इशान किशनला संधी मिळालेली नाही. कारण, इशान किशनने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेनंतर क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता.
याबरोबरच, प्रशिक्षक राहुल द्रविडने स्पष्ट केलं होतं की इशान किशनला स्वतःला उपलब्ध करून देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल. मग त्याचा निवडीसाठी विचार केला जाईल. दरम्यान, किशन सराव करत असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वीच आलं होतं. त्यावर इरफान पठाणने त्याचे नाव न घेता चिमटा काढलेला पहायला मिळालं आहे.
नुकतचं सोशल मीडियावर इशान किशनचा एक व्हिडिओ त्यामध्ये तो बडोद्यातील किरण मोरे अकॅडमीत सराव करताना दिसला होता. या व्हिडिओवरून किशनने राहुल द्रविडचा सल्ला मानला नसल्याची चर्चा सर्वत्र रंगली होती. याबरोबरच इशान किशनने झारखंडकडून रणजी ट्रॉफी खेळणे देखील बंद केले आहे.
यावरून, इरफान पठाणने ट्विटरवर एक पोस्ट लिहीत इशान किशनवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. इशान किशनचं नाव न घेता पाठाणने ट्विट केलं आहे की, ‘ हे खूप गोंधळात टाकणारं आहे. एखादा खेळाडू सराव करण्याइतपत फिट असतो. मात्र देशांतर्गत क्रिकेट सामने खेळण्याइतपत फिट कसा काय नसतो. याचा आपण अर्थ कसा लावायचा?
याआधी देखील भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने देखील इशान किशनबाबत वक्तव्य केलं होतं. जोपर्यंत इशान किशन देशांतर्गत क्रिकेट खेळत नाही तोपर्यंत त्याला संघात निवडलं जाणार नाही असं आकाश चोप्रा म्हणाला होता.
दरम्यान, आकाश चोप्रा पुढे बोलताना म्हणाला आहे की, ‘सध्या रणजी ट्रॉफीचे सामने होत आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेट सुरू आहे. इशान किशनने तिथे खेळून तो निवडीसाठी उपलब्ध असल्याचं दाखवून द्यावं लागेल. विशेष म्हणजे तो फोन देखील उचलत नाहीये आणि तो उपलब्ध असल्याचं सांगत नाही.’
महत्वाच्या बातम्या –
‘विराटसोबत कसोटी खेळण्यासाठी बुमराह उत्सुक होता’, दिग्गजाने सांगितला कसोटी पदार्पणाचा किस्सा