---Advertisement---

‘विराट कोहली असता तर…’, इंग्लंडच्या माजी दिग्गजाने केएल राहुलचे शतक हुकण्याबाबत केले मोठे वक्तव्य

KL-Rahul-Virat-Kohli
---Advertisement---

IND vs ENG: भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज केएल राहुल इंग्लंडविरुद्धच्या हैदराबाद कसोटी सामन्यात शतक झळकावू शकला नाही. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात त्याने आपली विकेट गमावली. इंग्लंडचा माजी खेळाडू मायकेल आथर्टन याने यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, केएल राहुलने शतक न करणे हा मोठा गुन्हा आहे. अथर्टनच्या मते, त्याच्या जागी विराट कोहली असता तर त्याने कधीच अशाप्रकारे विकेट्स सोडली नसती.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी केएल राहुल याने चांगली फलंदाजी केली मात्र त्याला शतक झळकावता आले नाही. राहुल त्याच्या कारकिर्दीतील 50 वा कसोटी सामनाही खेळत आहे. राहुलने पहिले अर्धशतक पूर्ण केले आणि तो आपले नववे कसोटी शतक झळकावेल असे वाटत होते पण तसे झाले नाही आणि तो 86 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. टॉम हार्टलीचा राहुल बळी ठरला, ज्याच्याविरुद्ध तो मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात डीप मिड-विकेटवर क्षेत्ररक्षकाने झेलबाद झाला. (ind vs eng michael atherton reacts on generous kl rahul throwing away his century)

अनेक भारतीय खेळाडूंचे शतक हुकले असून मायकेल अथर्टन यानी याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “इंग्लंड संघ नशीबवान होता की, भारतीय टॉप ऑर्डरने दया दाखवली आणि मोठी खेळी खेळली नाही. या सर्व फलंदाजांनी मोठी खेळी खेळली असती तर परिस्थिती आणखी बिघडू शकली असती. मला वाटत नाही की, विराट कोहली असता तर त्याने भारतीय फलंदाजांइतकी दया दाखवली असती. सर्वात मोठी चूक केएल राहुलची आहे, जो कोहलीच्या जागी चौथ्या क्रमांकावर खेळला होता, ज्याने आपली विकेट भेट दिली आणि शतक झळकावता आले नाही.” (If Virat Kohli had the former England legend made a big statement about KL Rahul’s century loss)

हेही वाचा

IND vs ENG: पहिल्या डावात 436 धावा करून टीम इंडिया ऑलआऊट, राहुल-जडेजाने दाखवली ताकद
टेस्टमध्ये पहिली विकेट मिळाल्यानंतर वेस्ट इंडिजच्या खेळाडूने साजरे केले अनोखे सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---