भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. पहिल्या दिवशी निराशाजनक सुरुवातीनंतर दणक्यात कमबॅक करणाऱ्या इंग्लडने दुसऱ्या दिवशीही धमाका केला आहे. तसेच रजत पाटिदारने पुन्हां एकदा निराशा केली आहे. याबरोबरच रजत पाटीदारला इंग्लंडसोबत खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळाली होती, परंतु आतापर्यंत त्याच्या बॅटमधून एकही चमकदार खेळी पाहायला मिळालेली नाही.
याबरोबरच, चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचा डाव संकटात असताना चाहत्यांना रजत पाटीदारकडून या सामन्यात आपल्या फलंदाजीने मोठी खेळी होईल अशी अपेक्षा होती, मात्र रजतने चाहत्यांच्या आशा पुन्हा धुळीला मिळवल्या आहेत. रांची कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना रजत पाटीदार अवघ्या 42 चेंडूत 17 धावा करून बाद झाला आहे.
याबाबत सोशल मीडियावर एका यूजरने कमेंट करत म्हंटले आहे की, कुलदीप यादव हा आरसीबीच्या रजत पाटीदारपेक्षा चांगला कसोटीपटू आहे. तसेच आणखी एका युजरने कमेंट करत म्हंटले आहे की,कुलदीप यादव देखील रजत पाटीदारपेक्षा अधिक ताकदीने फलंदाजी करत आहे.
तसेच इंग्लंडसोबत खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत रजत पाटीदारची बॅट शांत राहिली आहे. रजत पाटीदारला दुसऱ्या कसोटी सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. तर दुसऱ्या कसोटीच्या दोन्ही डावात रजतच्या बॅट मधून 9 आणि 32 धावा निघाल्या होत्या. याशिवाय तिसऱ्या कसोटी सामन्यात रजतने अनुक्रमे 0 आणि 5 धावा केल्या होत्या. त्यानंतर आज रजत पाटीदार 17 धावा करून बाद झाला आहे. त्यामुळे त्याच्यावरती संघाबाहेर जाण्याची टांगती तलवार सध्या निर्माण झाली आहे.
https://twitter.com/MahiGOAT07/status/1761309476173267125
दरम्यान, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने 7 गडी गमावून 219 धावा केल्या आहेत. तर पहिल्या डावात भारतीय संघाकडून फलंदाजी करताना यशस्वी जयस्वालने दुसऱ्या दिवशी सर्वाधिक 73 धावांची खेळी केली आहे. तर इंग्लंडकडून गोलंदाजी करताना फिरकी गोलंदाज शोएब बशीरने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –






