IND vs ENG Rajkot 3rd Test Playing 11 : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. तर या मालिकेत 1-1 ने बरोबरी झाली असून अजून तीन सामने शिल्लक आहेत. तर मालिकेतील तिसरा कसोटी सामना हा 15 ते 19 फेब्रुवारी रोजी राजकोट येथे खेळवण्यात येणार आहे. त्याआधी बीसीसीआयने उर्वरित 3 सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली. पहिल्या 2 सामन्यानंतर उर्वरित मालिकेतूनही विराट कोहली (Virat Kohli) हा वैयक्तिक कारणामुळे बाहेर पडला आहे.
याबरोबरच, दुखापतीनंतर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि केएल राहुल (KL Rahul) या दोघांची एन्ट्री झाली आहे. मात्र या दोघांची निवड फिटनेस टेस्टवर अवलंबून असणार आहे. मालिकेतील तिसऱ्या सामन्याला अवघे काही दिवस बाकी आहेत. तर जडेजा आणि राहुलला दुखापतींमुळे विशाखापट्टणम येथील दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर बसावे लागले होते.
अशा परिस्थितीत टीम इंडियाची प्लेइंग 11 कशी असेल याचा पुन्हा एकदा कर्णधार रोहित शर्मा समोर पेच निर्माण झाला आहे. याबरोबरच, रवींद्र जडेजा आणि केएल राहुल यांचा सहभाग बीसीसीआय वैद्यकीय संघाकडून फिटनेस क्लिअरन्सच्या अधीन आहे. अशी टीप बीसीसीआयने लिहिली आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटीपूर्वी हे दोन खेळाडू फिट होतील की नाही याबाबत शंका आहे. हे दोन्ही खेळाडू चौथ्या कसोटीपूर्वी फीट होतील असा अंदाज आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत यांच्या जागी नवोदीत खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे.
अशातच दुसरीकडे, रजत पाटीदार, ध्रुव जुरेल, सरफराज खान यांना पुन्हा संधी दिली आहे. तर आकाश दीपचा संघात समावेश केला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना राजकोट येथे 15 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. चौथी कसोटी रांची येथे 23 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होईल. मालिकेतील पाचवी आणि अंतिम कसोटी 07 मार्चपासून धर्मशाळा येथे खेळवली जाणार आहे.
दरम्यान, इंग्लंड क्रिकेट टीमला देखील मोठा झटका बसला आहे. इंग्लंडचा स्टार खेळाडू हा दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून बाहेर पडला आहे. इंग्लंडचा स्पिनर जॅक लीच हा सीरिजमधून बाहेर झाला आहे. जॅक लीच याला हैदराबाद कसोटी सामन्यात गुडघ्याला दुखापत झाली होती. लीचला याच दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातही खेळता आलं नाही. मात्र आता अखेर तो कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे.
महत्वाच्या बातम्या –
IND vs AUS : आराsssराsss खतरनाक! अंडर 19 वर्ल्ड कप फायनलमध्ये सौम्य पांडेने रचला इतिहास
U19 Word Cupमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करणारे खेळाडू, पराभवानंतर भारतीय खेळाडू टॉपवर