भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील चौथा सामना शुक्रवारी (23 फेब्रुवारी) रांचीमध्ये सुरू झाला. पाहुण्या इंग्लंडने या सामन्याची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाकडून शुक्रवारी आकाश दीप याला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. मालिकेतील आकास चौथा खेळाडू आहे, ज्याने भारतासाठी कसोटी पदार्पण केले.
भारतीय संघाने पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेतील पहिला सामना गमावला होता. पण मागच्या दोन सामन्यांमध्ये यजमान संघाने इंग्लंडला मोठ्या अंतराने मात दिली. सध्या भारत 2-1 अशा आघाडीवर आहे. मालिकेतील चौथा सामना राचीमध्ये खेळला जात असून भारताने याही सामन्यात विजय मिळवला, तर मालिका देखील यजमान संघाच्या नावावर होईल. दुसरीकडे पाहुण्या इंग्लंडला मालिकेत 2-2 अशी बरोबरी करण्यासाठी रांची कसोटी जिंकणे गरजेचे आहे.
मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात रजत पाटीदार याला कसोटी पदार्पणाची संधी दिली गेली. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात सरफराज आणि आणि ध्रुव जुरेल या दोघांनी कसोटी पदार्पण केले. आता मालिकेतील चौथ्या कसोटीत भारतीय संघ व्यवस्थापन आणि कर्णधार रोहित शर्मा आकाश दीप याचे कसोटी पदार्पण करवून घेत आहेत. वेगवान गोलंदाज आकाशने भारतासाठी अद्याप एकही सामना खेळला नाहीये. आतापर्यंत खेळलेल्या 30 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याने 23.58च्या सरासरीने 104 विकेट्स घेतल्या आहेत.
Akash Deep making his Test debut for India.
Many congratulations to him! pic.twitter.com/9KAattrKvY
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 23, 2024
जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्धच्या या कसोटी मालिकेत भारतासाठी चांगले प्रदर्शन करत होता. पण वर्कलोडचा विचार करून संघ व्यवस्थापनाने त्याला रांची कसोटीतून विश्रांती दिली. तत्पूर्वी श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि विराट कोहली हे महत्वाचे खेळाडूही या मालिकेत खेळत नाहीयेत.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
इंग्लंड: झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (डब्ल्यू), टॉम हार्टले, ऑली रॉबिन्सन, शोएब बशीर, जेम्स अँडरसन
भारत: यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, आकाश दीप (पदार्पण), कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
(IND vs ENG Ranchi Test England have won the toss and they’ve decided to bat first)
महत्वाच्या बातम्या –
IPL 2024 : गुजरात टायटन्सला मोठा धक्का, मोहम्मद शमी आयपीएल 2024 मधून बाहेर
रांची टेस्ट : मालिकेत बरोबरी करण्यासाठी इंग्लंड संघ सज्ज, भारताविरुद्ध चौथ्या कसोटीत ‘हे’ 11 शिलेदार उतरणार मैदानात






